आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौरव:उत्कृष्ट कार्याबद्दल दिनेश राका यांना पुरस्कार

जालना5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्र निर्माण कार्यात सतत अग्रेसर असलेल्या भारतीय जैन संघटना च्या जालना जिल्हाला उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल यांना नाशिक येथे झालेल्या कार्यक्रमात उत्कृष्ट कार्याचा पुरस्कार देण्यात आला.हा पुरस्कार राष्ट्रीय अध्यक्ष राजेन्द्र लुंकड तामिळनाडू याच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी राष्ट्राध्यक्ष राजेंद्रभाई म्हणाले की, जालन्यात भारतीय जैन संघटना जालना जिल्ह्य़ातील सर्व गावा गावात फिरून संघटनेचे उद्देश पोहोचून सतत संघटना अग्रेसर ठेवली त्यांचाच मार्गदर्शन सोबत घेऊन जिल्हा अध्यक्ष दिनेश राका यांनी राष्ट्र निर्माण करण्यासाठी वॉटर मिशन, मूल्यवर्धन शिक्षण, मुलीचे सक्षमीकरण, सामूहिक विवाह, आपत्ती व्यवस्थापन व समाज संघटन आदी कार्यात भरीव कामगिरी केली.

या बाबत जालन्याचे कौतुक केले. या वेळी जिल्हा अध्यक्ष राका यांच्यासह संतोष मुथा, ताराचंद कचेरीया, पवन सेठीया, अशोक संचेती, महिला अध्यक्ष नीता मुथा, उज्ज्वला भंडारी, किरण मुथा आदींची उपस्थिती होती. दरम्यान, जालना जिल्ह्यात व्यापारी महासंघाच्या वतीने मोठ्या प्रमाणात सामाजिक उपक्रम राबवले जातात. राज्यात जालन्याचे नाव मोठे आहे.

बातम्या आणखी आहेत...