आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वच्छता पुरस्कार वितरण:वडोद तांगडा विद्यालयास पुरस्कार

धावडा9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारत सरकार शिक्षण मंत्रालय दिल्ली व महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पूणे यांचे संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय स्वच्छ विद्यालय पुरस्कारासाठी भोकरदन तालुक्यातील वडोद तांगडा जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेची निवड झाली आहे. जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे हस्ते शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे.

हा पुरस्कार केंद्रीय मुख्याध्यापक जे. वाय. सय्यद, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मनोहर पवार, सरपंच वर्धमान वास्कर हे पुरस्कार स्विकारतील. वडोदतांगडा शाळेत विद्यार्थ्यासांठी विविध सोई सुवीधा पुरवून स्वच्छ शाळा व सुशोभिकरण करण्यात आले. डिजिटल शाळा बनवुन भौतिक सुविधा पुरविण्यात आल्या. अत्याधुनीक आरओ फ़िल्टर, व्यायाम शाळा, संगणक कक्ष, खेळांची मैदाने, सर्व यांत्रीक सुसज्ज स्वयंपाक गृह, दर्जेदार व पौष्टीक पोषण व पुरक आहार, सांस्कृतिक रंगमंच, बालवाचनालय, ऑक्सीजन तुळस पार्क, सुसज्ज इमारत व आसनव्यवस्था, ई लर्नीग कक्ष, मैदानात वृक्षारोपन, मुलांमुलींसाठी स्वतंत्र असे स्वच्छतागृह, नाविण्यपूर्ण प्रयोगशाळा, इमारतीला वॉटर हार्वेस्टींग करुन शाळेचे रूपडे पालटण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...