आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौरव:राेहिलागड येथील शाळेत केंद्रस्तरीय‎ उपक्रमशील शिक्षिका पुरस्कार प्रदान‎

अंबड6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील रोहिलागड येथील जिल्हा‎ परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेमध्ये निपुण भारत‎ अभियानांतर्गत माता पालक गटातील विद्यार्थी गुणवत्ता‎ वाढीसाठी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षिका- मातांना‎ रोहिलागड केंद्रांर्गत सोळा उपक्रम- शिक्षिकांना व सहा‎ लिडर मातांना शाल प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देवून‎ केंद्रस्तरीय उपक्रमशिल शिक्षिका व उपक्रमशिल‎ लिडर माता हा पुरस्कार देवून रोहिलागड केंद्राचे‎ केंद्रप्रमुख श्रीमंत गंगावणे यांच्या हस्ते गौरविण्यात‎ आले.

यावेळी छाया टकले, मुक्ता दुधाटकर, ललिता‎ पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सुप्रिया‎ खेडकर, बबिता भस्मारे, वैशाली वाघमारे, अर्चना‎ आहेर, छाया जाधव, अंजली माळोदे, मिरा गिराम,‎ अनुजा साळूंके, लता डोळे, वर्षा गोर्डे, सारीका टकले,‎ वैशाली भिसे, सारिका इंगळे, शेख परवीन, स्वाती‎ जगाडे आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन अश्रूबा‎ गवळी यांनी तर जयश्री गिरी यांनी आभार मानले.‎

बातम्या आणखी आहेत...