आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील १०० शिक्षक क्लबतर्फे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ देण्यात येणारे राज्यस्तरीय शिक्षक सेवागौरव व आदर्श शाळा पुरस्कार वितरण सोहळा आज जे. ई. एस. महाविद्यालयात पार पडला. कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून जेष्ठ समाजसेवक तथा प्रसिद्ध उद्योजक सुनील रायठठ्ठा तर प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून उपजिल्हाधिकारी, औरंगाबाद अंजली धानोरकर उपस्थित होत्या.
कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून मंगल धुपे शिक्षणाधिकारी, प्राचार्य विजयकुमार शिंदे, डॉ. सतिश सातव शिक्षण उपनिरीक्षक, प्राचार्य डॉ. शिवनारायण बजाज, डॉ. दत्तात्रय गाडेकर व उदय शिंदे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.या पुरस्कार वितरण सोहळ्यात राज्यातील २८ शिक्षकांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यात १४ शिक्षक जिल्हा परिषदेचे व १४ शिक्षक खाजगी शिक्षण संस्थेतुन निवडण्यात आले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.