आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरस्कार:व्यापारी बाळासाहेब शेळके यांना आदर्श व्यापारी पुरस्कार प्रदान

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील व्यापारी बाळासाहेब शेळके यांना व्यापारी महासंघ, जनरल मर्चंट कॅट व भारतीय जैन संघटना यांच्या वतीने आदर्श व्यापारी पुरस्कार प्रदान करण्यात येऊन सन्मान करण्यात आला.

जैन भवनात आयोजित दीपावली स्नेहमिलन कार्यक्रमात आदर्श व्यापारी पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला. कॅटचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष सुमित अग्रवाल, राज्य अध्यक्ष सचिन निवंगूने, राज्य उपाध्यक्ष सतीश पंच, भारतीय जैन संघटनेचे राज्य अध्यक्ष हस्तीमल बंब, दिनेश राका, प्रवीण मोहता, संजय भरतीया आदींच्या हस्ते बाळासाहेब शेळके यांना आदर्श व्यापारी पुरस्कार प्रदान करण्यात आला. सन्मानपत्र, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

बातम्या आणखी आहेत...