आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराजूर येथील डायनामिक इंग्लिश स्कूल व खरात मामा प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन काल मोठ्या उत्साहात पार पडले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध कलाविष्काराने राजूर आणि परिसरातील सर्व पालक आणि रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन सुधाकर पाटील दानवे यांच्या हस्ते पार पडले.
दीप प्रज्वलन उद्घाटन प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष बाबुराव मामा खरात, सरपंच प्रतिभाताई भुंजग, संस्थेचे सचिव गणेश खरात, जिजाबाई खरात, राधिकाताई खरात, माजी सरपंच भाऊसाहेब भुजंग, शिवाजी थोटे, कैलास पुंगळे, रामेश्वर सोनवणे, माजी उपसभापती गजानन नागवे, शामराव पुंगळे, आप्पासाहेब पुंगळे, राम पारवे, राहुल दरक, श्रीराम पुंगळे, आप्पासाहेब साखरे शिवाजी बोर्डे, जुमान शहा, योगिताताई दानवे, सुधाकर नागवे, बाबासाहेब खरात, गणेश खरात,राजु रगडे, नवनाथ फुके, अरुण कासारे, रमेश राऊत, भगवान नागवे, शंकर नागवे, विठ्ठल इंगेवार, डायनामिक इंग्लिश स्कूल व खरात मामा प्रा. माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सुरेश कासारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीत आणि गणेश वंदना ने झाली. कार्यक्रम जसा जसा पुढे जात होता तशी तशी प्रेक्षकांची गर्दी वाढत होती प्रेक्षकांच्या गर्दीने संपूर्ण परिसर फुलून गेला होता. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध कलाविष्काराचा विद्यार्थी व पालक यांनी मनसोक्त आनंद घेतला. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध नृत्याने उपस्थित प्रेक्षकांची वाहवा मिळवली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भास्कर पडोळ व संदीप कुमार साळवे यांनी केले तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक सुरेश कासारे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे प्रवीणकुमार देशमुख, रामेश्वर नागवे, संदीप कुमार साळवे, भास्कर पडोळ, विकास घोरपडे, चव्हाण, रीना कासारे, सोनाली इंगेवार, दिपाली शिनगारे, वैशाली ठोंबरे, रूपाली तायडे, प्रीती तायडे, सीमा कासारे, स्वाती लोणकर, प्रियंका सेठीया, शितल इंगळे, साक्षी पिंपळे, सुरेखा सोनवणे, सुरेश बावणे, सोनू खरात, रामकिसन हिवाळे, राजेश, गोपाल सोनवणे इत्यादींनी परिश्रम घेतले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.