आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:महाकाळा येथे जागतिक मृदा दिनानिमित्त शेतकऱ्यांत जनजागृती

वडीगोद्री2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जागतिक मृदा दिनानिमित्त राष्ट्रीय कृषि विकास योजनेअंतर्गत घेण्यात आलेल्या माती नमुन्यांचे अहवाल मृद आरोग्य पत्रिकेचेे वाटप करण्यात येऊन माती परीक्षणाचे महत्त्व सांगून या मृद आरोग्य पत्रिके नुसार एकात्मिक अन्न द्रव्ये व्यवस्थापन, ऊस पिकातील पाचट व्यवस्थापन बाबत मार्गदर्शन कृषि सहाय्यक विजय जाधव यांनी केले.

या यावेळी गावचे सरपंच दताभाऊ फुलझळके, आबासाहेब लहाने, जयमंगल कव्हळे तसेच सरपंच महाकाळा यांच्या हस्ते शेतकरी बांधवांना आरोग्य पत्रिका वाटप करण्यात आले. यावेळी भागवत दातवासे, दत्तात्रय लगड, राधाकिसन काळे, रामदास फटागडे, शंकर दिलवाले, श्यामसुंदर लहाने, विश्वंभर लहाने, शरद कव्हळे, गणेश लहाने, गणेश कव्हळे, विजय लहाने, देवराव वाघमारे, भागवत वाघमारे, भागवत लगड, पांडुरंग लगड, सुरेश पटेकर व शेतकरी बांधवांची उपस्थीती होती.

बातम्या आणखी आहेत...