आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपादन:आमदार राजेश राठोड यांच्या  नेतृत्वात काँग्रेसची आजादी गौरव पदयात्रा

मंठा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. स्वातंत्र्यलढ्यात काँग्रेसचे फार मोठे योगदान असून, काँग्रेसच्या प्रखर राष्ट्रभक्तीतूनच देशाला स्वातंत्र्य मिळाले. देशाची प्रगती साधली, असे प्रतिपादन आमदार राजेश राठोड यांनी केले. त्यांच्या नेतृत्वात आणि काँग्रेसचे नेते अन्वर देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत मंठा आणि उमरखेडा येथे शनिवारी आजादी गौरव पदयात्रा पार पडली.

येथील छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून तसेच स्वातंत्र्याचा जयघोष करीत पदयात्रा मुख्य रस्त्यावरून पुढे मार्गस्थ झाली. यावेळी तालुकाध्यक्ष निळकंठ वायाळ, जिल्हा सरचिटणीस अण्णासाहेब खंदारे, युवक प्रदेश सचीव सुरेश वाव्हळे, शरद बोराडे, बाबासाहेब देशमुख, सिराज खान पठाण, नगरसेवक राजेश खंदारे, मुसा कुरेशी, प्रकाश घुले, कयूम कुरेशी, सचिन राठोड, डॉ.शरद शेळके, कबीर तांबोळी, मोईन कुरेशी, नितीन राठोड, अरुण कांगणे, संतोष दिंडे, हरिभाऊ देशमुख, अशोक चव्हाण, भूषण राठोड, सुनील राठोड यांच्यासह काँग्रेस पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...