आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:बठाण फाटा ते गाव रस्त्याची दुरवस्था

जालना18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंबड तालुक्यातील बठाण खुर्द फाटा ते गाव रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. या रस्त्यावरून वाहन चालविणे कठीण झाले आहे. गाव ते फाटा या दोन किलोमीटर रस्त्यावर अनेकांचे अपघात झाले आहे. संबंधितांनी लक्ष देऊन या रस्त्याचे डांबरीकरण करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. गेल्या अनेक वर्षापासून बठाण खुर्द ते फाटा या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली नाही. या रस्त्यावर दुधना नदीचा पूल असून त्याचीही दुरवस्था झालेली आहे. दोन किलोमीटर अंतर असलेल्या या मार्गावरुन बठाण बुद्रुक, गोलापांगरी ते जालना, अंबड अशी गावे जोडली आहे.

त्यामुळे या रस्त्यावर नेहमीच दुचाकी व चारचाकी वाहनांची मोठी वर्दळ असते. गेल्या अनेक दिवसांपासून या रस्त्यासंदर्भात प्रशासनाकडे निवेदन देवून या रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी केली आहे. परंतु, प्रशासनासह लोकप्रतिनिधीचे याकडे दुर्लक्ष आहे. गावातून महाविद्यालय व शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे. दहा वर्षापूर्वी माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या स्थानिक आमदार निधीतून या रस्त्याचे काम करण्यात आले होते. परंतु, रस्त्यावर अतिशय वर्दळ असल्यामुळे नंतरच्या काळात या रस्त्याची डागडुजी करण्यात आली नाही. सध्या या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असून रस्त्याची पार वाट लागली आहे. त्यामुळे तत्काळ डांबरीकरण करावे, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य गजानन वीर, राजू वीर, निवृत्ती शेळके, परमेश्वर सानप, सोनू म्हस्के यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...