आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौरव सोहळा:बागल यांना आदर्श शिक्षक पुरस्कार; पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते करण्यात आला गौरव

परतूर7 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दहिफळ भोंगाने या शाळेवर कार्यरत शिक्षक, गटशिक्षणाधिकारी कार्यालयात येथे गट समन्वयक पदी नियुक्तीवर असणारे कल्याणराव बागल यांना जिल्हा परिषद जालना यांच्यावतीने दिला जाणारा सन २०२१-२२ या वर्षाच्या आदर्श शिक्षक पुरस्कार रविवारी अंबड येथे आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रदान करण्यात आला.

राज्याचे आरोग्य मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालक मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते, माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सदरील पुरस्काराचे वितरण कल्याण बागल यांना सपत्नीक करण्यात आले. यावेळी परतूर तालुक्यातील शिक्षक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कल्याणराव बागल यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल तालुक्यातील शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे. परतूर तालुका पत्रकार संघाच्या वतीने रविवारी त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी तात्याराव पवार, वैजनाथराव बागल, दिपक मुजमुले,मुन्ना चित्तोडा, आशिष गारकर, अजय देसाई, अर्जुन पाडेवार, राजकुमार भारुका, जावेद पठाण, एम.एल.कुरेशी, मुस्ताक देशमुख, राहुल मुजमुले, दीपक हिवाळे, आदींची यावेळी उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...