आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:वारकरी युवकांकडून बागेश्वरबुवांचा निषेध‎

भोकरदन2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

‎जगतगुरू संतश्रेष्ठ तुकाराम‎ महाराज यांच्या बद्दल गरळ‎ ओकणाऱ्या बागेश्वर बुवा उर्फ‎ धीरेंद्र शास्रीवर कारवाई करण्याची‎ मागणी करुन वारकरी विचारांच्या‎ युवकांनी छत्रपती शिवाजी‎ महाराजांच्या स्मारकाजवळ एकत्र‎ येवून निषेध व्यक्त केला.‎

बागेश्वरच्या निच मानसिकेचा,‎ बागेश्वर बाबा उर्फ दिरेद्र शास्री‎ यानी अखंड हिन्दुस्तानाचे आराध्य‎ दैवत छत्रपती शिवाजी महाराज‎ यांचे आद्य गुरु , त्यागी रत्न वैराग्य‎ मुर्ती तथा वारकरी सांप्रदायाचे‎ महामेरू महान संत श्री. तुकाराम‎ महाराज यांच्याबद्दल प्रवचनातुन‎ गरळ ओकुन या गलीच्छ माणसाने‎ अपशब्द वापरून त्यांचा तसेच‎ संबध महाराष्ट्राच्या संत परंपरेचा‎ मोठा अपमान केला असुन समस्त‎ वारकरी पंरंपरेचा अपमान झाला‎ असुन धिरेंद्र शास्री याच्यावर‎ भावना दुखावल्याचा गुन्हा दाखल‎ करावा यासाठी घोषणाबाजी करून‎ निषेध व्यक्त केला आणि पोलीस‎ प्रशासनास बागेश्वर बुवा विरुद्ध‎ समस्त वारकरी परंपरेच्या भावना‎ दुखावल्याबद्दल गुन्हा दाखल‎ करण्याची मांगणी केली.

यावेळी‎ विष्णू गाढे, विकास जाधव,‎ नारायण लोखंडे, आप्पासाहेब‎ जाधव, सांडू नामदे, दीपक‎ जाधव, सुरज मव्हारे, ईश्वर‎ इंगळे, जनार्धन तळेकर, राजू‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ ढोके, कृष्णा लोखंडे, संदीप‎ भोकरे, भागवत लोखंडे, विशाल‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ लोखंडे, समाधान खांडवे,‎ बालाजी लोखंडे, विजू लोखंडे,‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ राजू जाधव, विशाल लोखंडे आदी‎ उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...