आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रंगभूमी दिन:बालनाट्य महोत्सवाचे पडघम पुन्हा वाजतील : सुंदर कुंवरपुरिया

जालना5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना परिस्थितीमुळे दोन वर्षांपासून मंदावलेला नाट्यांकुर बालनाट्य महोत्सव यंदा पुन्हा बहरणार अाहे. नवीन कलाकृती नव्या अनेक विषयांसह मराठी रंगभूमीवर पुन्हा नव्याने उभारून येतील, असा विश्वास जेष्ठ रंगकर्मी, नाट्य लेखक, दिग्दर्शक तथा नाट्यांकुरचे सचिव सुंदर कुंवरपुरिया यांनी येथे बोलताना व्यक्त केला.

मा. कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृह परिसरात नाट्यांकुर बालनाट्य संस्थेच्या वतीने जागतिक मराठी रंगभूमी दिन शनिवारी उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्त आयोजित कार्यक्रमात सुंदर कुंवरपुरिया बोलत होते. प्रकल्प प्रमुख आशीष रसाळ, जयेश पहाडे, रूपाली सेठ, अमित काळे यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती. सुंदर कुंवरपुरिया पुढे म्हणाले, स्व. विष्णू दास भावे यांची जयंती मराठी रंगभूमी दिन म्हणून साजरी करत असताना या ऐतिहासिक दिनी नव्या ने नाट्य संहिता लेखन, नाटक, अभिनयांच्या तालीम सुरू करणे अभिप्रेत असल्याचे नमूद करत सांस्कृतिक क्षेत्रात सक्रीय असलेल्या धुरिणांनी त्या सुरू कराव्यात. अशी अपेक्षा सुंदर कुंवरपुरिया यांनी व्यक्त केली.

प्रकल्प प्रमुख आशिष रसाळ यांनी बालनाट्य महोत्सव आयोजित करण्याबाबत नियोजन केले जात असून आगामी महिनाभरात या बाबत अध्यक्षांच्या परवानगी ने घोषणा केली जाईल असे सांगितले. रंगभूमी दिन व प्रकट दिनाचे औचित्य साधून सुंदर कुंवरपुरिया यांचे अभीष्टचिंतन आणि सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन रूपाली सेठ यांनी केले तर प्रकल्प प्रमुख जयेश पहाडे यांनी आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...