आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:जाफराबादेत बंदला प्रतिसाद, तहसीलदारांना दिले निवेदन

जाफराबाद24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रेषित मोहम्मद पैगंबर (स.) यांच्या विषयी अपमान जनक वक्तव्य केल्याबद्दल नुपूर शर्मा आणि नविनकुमार जिंदल यांच्यावर कठोर कारवाईच्या मागणीसाठी मुस्लिम समाजाच्या जाफराबाद शहर बंदचे आयोजन करण्यात आले होते.

तहसीलदारांमार्फत राष्ट्रपतींना पाठवलेल्या निवेदनात म्हटले, भाजपची राष्ट्रीय प्रवक्ता नुपुर शर्मा, नविनकुमार जिंदल यांनी एका टिवी डिबेटमधे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्यावर अपमानजनक वक्तव्य केले ज्याचा जगभरातुन निषेध करण्यात येत आहे. जाफराबाद येथील समस्त मुस्लिम समाजातर्फे बंदचे आवाहन करण्यात आले होते. मुस्लिम समाज बांधवांतर्फे जुमाची नमाज़ अदा केल्यानंतर निवेदन देण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...