आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीएम-किसान:पीएम-किसानच्या लाभासाठी आधारशी जोडावे बँकेचे खाते

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा निरंतर लाभ मिळण्यासाठी बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्नीकरण तसेच योजनेचे ई- केवायसी करण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके यांनी केले आहे.

यासाठी https://pmkisan.gov.in या वेबसाइटवरील फार्मर कॉर्नर या टॅबमध्ये किंवा पी.एम. किसान अॅपव्दारे ओटीपीव्दारे लाभार्थींना स्वतः ई - केवायसी प्रमाणीकरण मोफत करता येईल. ग्राहक सेवा (सीएससी) केंद्रावर ई - केवायसी प्रमाणिकरण बायोमॅट्रिक पध्दतीने करता येईल. केंद्र शासनाकडून ग्राहक सेवा केंद्र (सीएससी) केंद्रावर बायोमॅट्रिक पध्दतीने केवायसी प्रमाणीकरण करण्यासाठी प्रती लाभार्थी प्रती बायोमॅट्रिक प्रमाणीकरण दर १५ रुपये निश्चित करण्यात आले आहे.

तसेच सर्व पात्र लाभार्थ्यांना पुढील ऑगस्ट- नोव्हेंबर २०२२ या कालावधीची लाभ प्राप्त होण्यापुर्वी ई - केवायसी प्रमाणिकरण प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली आहे. जालना जिल्ह्यातील आधार प्रमाणित एकूण ३ लाख ५४ हजार ३२१ लाभार्थ्यांपैकी २ लाख ३९ हजार ४४ लाभार्थ्यांचे ई - केवायसी प्रमाणिकरण पुर्ण झाले असून उर्वरित १ लाख १५ हजार २७७ लाभार्थ्यांचे ई - केवायसी प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे.

बातम्या आणखी आहेत...