आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:सार्वजनिक ठिकाणी वावरताना सतर्कता बाळगावी; पो.नि. शामसुंदर कौठाळे यांचे आवाहन, आनंद विद्यालयात केले मार्गदर्शन

परतूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सार्वजनिक ठिकाणी वावरतांना शालेय विद्यार्थ्यानी सतर्कता बाळगण्याची आवश्यकता आहे. परिसरात घडणाऱ्या संशयास्पद हालचाली बाबत, एखाद्या अनोळखी व्यक्तिच्या जवळीकतेबाबत मुलांनी तातडीने आपल्या आपल्या पालकांशी,शिक्षकांशी बोलले पाहिजे. आपल्याला नकोसा असलेला प्रत्येक स्पर्श बॅड टच असतो, या बाबत वेळीत प्रतिकार केला पाहिजे असे पोलिस निरीक्षक शामसुंदर कौठाळे यांनी सांगितले.

परतूर शहरातील आनंद इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रतिकृतीचे प्रदर्शन आणि विद्यार्थी परिषदेचे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला एसबीआयचे शाखाव्यवस्थापक अतुल सावजी, मनोहर जावडे, संस्थेचे अध्यक्ष एकनाथ कदम, डॉ. भानुदास कदम, मुख्याध्यापिका सत्याशिला तौर यांची उपस्थिती होती. शालेय स्तरावरील मुलांच्या बाबतीत कुटुंबस्तरावर देखील अधिक खबरदारी घेण्याची गरज आहे. शाळेत घडणाऱ्या विशिष्ट घडामोडीबाबत पालकांनी मुलांशी नियमित चर्चा केली पाहिजे. ‘गुड टच-बॅड टच’ बाबतीत मुलांना शाळेतून, कुटुंबातून अधिक जागरूक करता येऊ शकते.विद्यार्थ्यांनी कुठल्याही दबावाला बळी न पडता, आपल्यावर होणाऱ्या अन्यायाची वाच्यता आपल्या पालकांकडे, शाळेतील शिक्षकांकडे करायला हवी.

विशेषतःशालेय स्तरावरच्या मुलांनी मोबाईल, सोशल मिडिया पासून दूर राहण्याचा सल्ला कौठाळे यांनी दिला. शालेय अभ्यासक्रम अधिक कृतिशील आणि विद्यार्थ्यांचा सहभाग असणारा असल्यास तो अधिक प्रभावी ठरू शकतो, अधिकाधिक कृतियुक्त अध्ययन अनुभव विद्यार्थ्याना दिल्यास त्यांची धारणा अधिक दृढ होण्यास मदत होत असल्याचे सांगत, विद्यार्थ्यानी तयार केलेल्या प्रतिकृती त्यांना अधिक अनुभव संपन्न होण्यास मदत करतील असे मत संस्थेचे अध्यक्ष एकनाथ कदम यांनी व्यक्त केले. प्रास्ताविक मुख्याध्यापिका सत्यशिला तौर यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...