आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हुंड्यासाठी नवविवाहितेचा खून:लिंबू तोंडात कोंबून मारहाण, सासरच्या लोकांनीच खून केल्याचा नातेवाइकांचा आरोप

हसनाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
घटनास्थळी पाहणी करून पंचनामा करताना हसनाबाद ठाण्याचे पोलिस. इन्सेटमध्ये मृत नुसरत कुरेशी. - Divya Marathi
घटनास्थळी पाहणी करून पंचनामा करताना हसनाबाद ठाण्याचे पोलिस. इन्सेटमध्ये मृत नुसरत कुरेशी.

जालना जिल्ह्यातील हसनाबाद येथे कुरेशी मोहल्ला भागात ३१ मे रोजी नुसरत इम्रान कुरेशी (२२) या नवविवाहितेचा मृतदेह घरात आढळला. दरम्यान, पतीच्या अनैतिक संबंधांची रेकॉर्डिंग माहेरच्या लाेकांना पाठवली तसेच व्यवसायासाठी एक लाखाची मागणी करत सासरच्या लाेकांनीच तिचा खून केल्याचा आरोप नुसरतच्या माहेरच्या मंडळींनी केला.

नुसरत वेड्यासारखी करते म्हणत सासरकडील लाेकांनी तिला एका दर्ग्यात नेले व तेथे लिंबू ताेंडात कोंबून मोरपंख डाेक्यावर मारत तिचा गळा दाबून जिवे मारण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर तिचा खून केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. हसनाबादच्या इम्रान कुरेशीसोबत बदनापूर तालुक्यातील रोषणगाव येथील नुसरतचा दोन महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. लग्नानंतर एक महिना तिला चांगले वागवण्यात आले. परंतु नंतर हुंड्यासाठी सतत तिचा छळ सुरू होता, असे तिच्या नातेवाइकांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, घरात मृतदेह आढळल्यानंतर ताे रुग्णालयात आणण्यात आला. तेथे नातेवाइकांनी मोठी गर्दी केली. माहेरकडील मंडळींनी कारवाईची मागणी करत आक्रमक पवित्रा घेतल्याने हसनाबाद प्राथमिक आरोग्य केंद्र व पोलिस ठाण्याच्या आवारात काही काळ तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे शवविच्छेदनास २४ तास लागले. मौलाना असला मातम कुरेशी (३५, पारडगाव) यांच्या फिर्यादीवरून पती इम्रान महेमूद, सासू, सासरा महेमूद (हसनाबाद), नणंद, नंदवई शाहरुख कुरेशी नवगाव, दुसरी नणंद आस्मा कुरेशी व नंदवई जावेद कुरेशी (अजिंठा), शबानाबी नसीर, नसीर कुरेशी (रोषणगाव), खातूनबी कुरेशी व मजिद कुरेशी (पैठण) यांच्याविरुद्ध हसनाबाद ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक तडवी करत आहेत.

लाल रंगाचा ड्रेस, हातात बांगड्या घालून दर्ग्यात नेल्याचे नमूद
नूसरतचा पती इम्रानचे अनैतिक संबंध होते. यासंदर्भातील रेकॉर्डिंग तिने माहेरच्या मंडळींना दिली होती. दरम्यान, दर्ग्यात नेताना नूसरतला लाल रंगाचा ड्रेस, हातात बांगड्या घालण्यात आले. येथे तिच्या तोंडात लिंबू कोंबून गळा दाबला जात होता, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...