आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मारहाण:दांपत्याला मारहाण; दुचाकी, सोने लुटले

जालना16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नूतन वसाहत भागातील बाजारातून खरेदी करून जिल्हा परिषद क्वार्टर परिसरातील निवासस्थानांकडे दुचाकीवरून जात असलेल्या दांपत्याला तिघांनी अडवून मारहाण करत रोख रक्कम, मंगळसूत्र व दुचाकी चोरून नेली. शुक्रवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला.

या प्रकरणी देविदास विश्वनाथ म्हस्के (३० रा. रमाबाईनगर) यांनी फिर्याद दिली आहे. ते पत्नीसह नूतन वसाहत मार्केटमधून खरेदी करून शुक्रवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास घरी जात असताना, जिल्हा परिषद उपाध्यक्षांच्या क्वॉर्टरजवळ संशयित शुभम राहुल साबळे (रा. रमाबाईनगर) व अन्य तिघांनी म्हस्के यांची गाडी अडवली. शुभम साबळे याने मारहाण करत चाकूने वार करून जखमी केले. पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र, रोख रक्कम व दुचाकी हिसकावून घेतली.

बातम्या आणखी आहेत...