आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मारहाण:रॉडने मारहाण अन् वाहनांची तोडफोड

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पेट्रोल भरत असतांना चार ते पाच जणांनी लोखंडी रॉडने मारहाण करून जखमी केले. शिवाय, कारसह दोन दुचाकींची तोडफोड करून नुकसान केल्याची घटना बदनापूर तालुक्यातील दावलवाडी येथील सारथी पेट्रोल पंपावर शनिवारी रात्री एक वाजेच्या सुमारास घडली. यात दोघे किरकोळ जखमी झाले आहेत. चंदनझिरा परिसरातील विशाल राजेंद्र छडीदार शनिवारी रात्री जालना औरंगाबाद रोडवरील दावलवाडी जवळील सारथी पेट्रोल पंपावर उभा होता. त्याच वेळी काही तरुणांनी तेथे उभा असलेल्या तीन तरुणांनासह फिर्यादी विशाल छडीदार यांना शिविगाळ केली. त्यानंतर लोखंडी रॉडने मारहाण केली. यात दोघे जण जखमी झाले आहे. त्यानंतर अज्ञात तीन ते चार आरोपींनी फिर्यादीची कार व साक्षीदार यांच्या दोन दुचाकींची तोडफोड केली.

बातम्या आणखी आहेत...