आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यशाळेचे आयोजन:मेंदी कला आत्मसात करून स्वयंनिर्भर व्हावे ; भावना शर्मा

जाफराबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीमती दानकुँवर हिंदी कन्या विद्यालयाच्या स्वर्गीय शेठ जयलालजी सभागृहात बंगळुरू येथील भावना शर्मा यांचा मेंदी कला या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. सुरुवातीला कार्यक्रमाची सुरुवात ही दीप प्रज्वलाने झाली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून भावना शर्मा, चित्रकार सतीश संचेती, अहिर गवळी समाज महिला कार्यकर्ता संगीता भगत, अमेझिंग लोकलच्या संचालिका पूजा जाधव यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

भावना शर्मा यांनी मेंदीविषयी विशेष मार्गदर्शन केले. मेंदीला लागणाऱ्या वस्तू व ते कसे तयार करावे. यांच्या विषयी मार्गदर्शन केले . या कार्यक्रमाला विद्यार्थिनी व शहरातील महिलांची उपस्थिती होती. सर्व सहभागीना प्रमाणपत्र प्रमुख पाहुण्याच्या हस्ते वितरित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुक्मिणी मेंदी आर्टच्या संचालिका दीपिका भुरेवाल यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...