आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआजचा विद्यार्थी हा उद्याचा नागरिक आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या कर्मावर विश्वास ठेवावा, कठोर मेहनत घ्यावी म्हणजे यश मिळेलच, तसेच जिल्ह्यात फक्त दोनच शाळेला धनगर समाज योजनेतून वसतिगृह मिळाले असल्याचे माजी मंत्री आमदार राजेश टोपे यांनी सांगितले.
बदनापूर येथे आर.पी. इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीने धनगर समाज योजनेअंतर्गत प्रवेशित विद्यार्थ्यांच्या व दहावी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार नारायण कुचे होते. व्याख्याते म्हणून प्रा. बी. वाय. कुलकर्णी यांची उपस्थिती होती. प्रास्ताविकात संस्थेचे अध्यक्ष भरत भांदरगे यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पुणे, मुंबईच्या दर्जाचे शिक्षण देण्याचे ध्येय असून संस्थेचे अनेक विद्यार्थी व एम.बी.बी.एस. व नामांकित महाविद्यालयात इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असल्याचेही नमूद केले. सूत्रसंचालन सतीश लिंगडे, सुमीत शर्मा यांनी तर स्वरूप शिंदे यांनी आभार मानले. याप्रसंगी समाज कल्याण विभागाचे जलील शेख, अमित घवले, डी. आर. वाघ, संदीप कांबळे, वंदना भांदरगे, सुशील भांदरगे आदी उपस्थित होते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.