आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्या:प्रियकर महिलेचा लग्नासाठी तगादा; युवकाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

परतूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मैत्रीचे सबंध असलेल्या प्रियकर महिलेने लग्न करण्यासाठी तगादा लावल्याने त्रासाला कंटाळून युवकाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. मंठा तालुक्यातील गोसावी पांगरी येथे मंगळवारी हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी प्रेयसीविरुद्ध परतूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंद्रकला तातेराव मानकर (गोसावी पांगरी, ता.मंठा) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, २३ नोव्हेंबर रोजी मुलगा शरद तातेराव मानकर हा सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास बाहेरगावी चाललो असे म्हणून घरातून निघून गेला. त्यानंतर थोड्या फोन करून घरी बोलावले. मात्र घरी आला नाही. त्यानंतर शरद यास वारंवार फोन केला असता त्याचा फोन लागत नव्हता.

तेव्हा आजूबाजूला नातेवाइकांकडे, शेजाऱ्याकडे विचारले असता तो आढळला नाही. २९ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास मुलगा संपत मानकर हा गोसावी पांगरी शिवारातील शेतात बैल चारण्यासाठी गेला होता. तेव्हा त्यास शेतातील विहिरीतून वास येत असल्याने त्याने विहिरीत डोकावून बघितले असता शरदचा मृतदेह पाण्यात तरंगताना दिसला. दरम्यान, शरदच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून लग्नासाठी तगादा लावणाऱ्या महिलेविरुद्ध परतूर पोलिसांत गुन्हा दाखल झाला. तपास सहायक पोलिस निरीक्षक सचिन पुंडगे करीत आहेत.

शरदला एका महिलेचा मानसिक त्रास
मुलगा शरद मानकर व गावातील एक महिला या दोघांचे मैत्रीचे संबंध होते. ती नेहमी शरद याला आपण पळून जाऊन लग्न करू, तू माझ्याशी लग्न केले नाही तर तुझे लग्न होऊ देणार नाही, असे म्हणून शरद यास नेहमी मानसिक त्रास देत होती. मुलाने घटनेबाबत घरी सांगितले असता महिलेला समजावून सांगितले. परंतु, तिने ऐकले नाही. शरदला लग्न कर म्हणून नेहमी त्रास देत होती. प्रेयसीच्या त्रासाला कंटाळून शरद मानकर यांनी गोसावी पांगरी शिवारातील शेतातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली, असे शरदच्या आईने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...