आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेत्र तपासणी शिबिर:सामाजिक उपक्रमातून वंचित घटकाला फायदा

श्रीक्षेत्र राजूर2 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • आमदार संतोष दानवे यांचे प्रतिपादन, सामाजिक उपक्रम

वाढदिवसाला अनाठायी खर्च न करता सामाजिक उपक्रम साजरे करणे आवश्यक आहे. त्यामुळे समाजातील वंचित घटकाला फायदा होतो. असे प्रतिपादन आमदार संतोष दानवे यांनी केले.

राजूर येथे केंद्रिय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या वाढदिवसानिमित्त श्री गणपती संस्थान, ग्रामपंचायत कार्यालय, गणपती नेत्रालय व ग्रामीण रूग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय मोफत मोतीबिंदु शस्त्रक्रिया व नेत्र तपासणी शिबीराचे आयेाजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी निर्मला दानवे तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार नारायण कुचे, उपसभापती भास्कराव दानवे, शिवाजीराव थोटे, सुधाकरराव दानवे, उपसभापती रामलाल चव्हाण, सरपंच भाऊसाहेब भुजंग, भागवत बावणे, कपिल दहेकर यांची उपस्थिती होती. आमदार दानवे म्हणाले, राजूर येथे आयोजित शिबीर हे सर्व समाजातील घटकांसाठी उपयुक्त आहे. नागरिकांनी सुध्दा आरोग्याबाबत दक्ष राहून काळजी घेणे आवश्यक आहे.

मंत्री दानवे यांच्या प्रयत्नामुळे भोकरदन- जाफराबादचा मागासलेपणाची ओळख पुसण्याचे काम होत आहे. यावेळी डॉ. पी. एल. वाडीकर, डॉ. घोडके, डॉ. संजय पगारे, डॉ. राठोड, गजानन नागवे, ज्ञानेश्वर पुंगळे, विनोद डवले,रामेश्वर सोनवणे, मुसा सौदागर, राहूल दरक, आप्पासाहेब पुंगळे, आप्पासाहेब साखरे, जगन पवार, रामदास तळेकर, शोभा मतकर, योगिता दानवे, सुशिलाबाई भुजंग, डॉ.कावले, डॉ.साजेद शेख, पंढरीनाथ करपे, प्रशांत दानवे, गणेश साबळे, ग्रामविकास अधिकारी प्रमोद पुंगळे, रतन ठोंबरे, मोहीनीराज मापारी, मुकेश अग्रवाल, भगवान नागवे, डॉ.प्रज्वल पाटील, समाधान माळी, भगवान टेपले, जगन्नाथ थोटे आदी उपस्थित होते. सुत्रसंचालन समाधान माळी यांनी तर प्रशांत दानवे यांनी आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...