आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरस्कार‎:जालना पोलिस दलास‎ बेस्ट युनिटचा पुरस्कार‎

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पोलिस महासंचालक‎ कार्यालयाच्या वतीने जालना पोलिस‎ दलास बेस्ट युनिटचा पुरस्कार जाहीर‎ करण्यात आला आहे. २०२१ च्या‎ कामगिरीसाठी हा पुरस्कार देण्यात‎ आला आहे. पोलिस घटकाची‎ कार्यक्षमता आणि कामगिरी‎ वाढविणे, आणि दिलेल्या मर्यादेमध्ये‎ उत्कृष्ट पद्धतीने काम करणे, तसेच‎ गुन्हेगारीला प्रतिबंध आणि गुन्ह्याचा‎ तपास यासाठी हा पुरस्कार देण्यात‎ येतो.

महाराष्ट्र राज्य पोलिस‎ घटकांतील जानेवारी २०२१ ते डिसेंबर‎ २०२१ मध्ये दाखल गुन्ह्यांची माहिती‎ विचारात घेऊन वार्षिक गुन्हेगारीच्या‎ आधारावर ३ श्रेणी मध्ये पोलिस‎ घटकाची विभागणी करण्यात आली‎ होती. व पोलिस घटक निवडीसाठी‎ वरिष्ठ पोलिस अधिकारी यांच्या‎ मूल्यांकन समित्या तयार करण्यात‎ आल्या होत्या.‎

बातम्या आणखी आहेत...