आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभगवद्गीता हा केवळ धार्मिक ग्रंथ नव्हे, तर त्यात जीवनाच्या तत्त्वज्ञानाचे सार आहेत. सर्व उपनिषदे हे गाय असून गीता हे दूध आहे. जो हे दूध प्राशन करेल, त्याचं पोषण झाल्याशिवाय राहणार नाही. ज्याप्रमाणे बदाम खाल्ल्यावर आपला मेंदू तल्लख बनतो व आपले पोषण चांगल्या प्रकारे होते. त्याचप्रमाणे गीता हे आपल्या मनाला पोषण देण्यासाठी बदाम आहे, असे प्रतिपादन मुख्याध्यापक विष्णू सोनवणे यांनी केले.
अंबड येथील कै. दत्ताजी भाले प्राथमिक विद्यालयात गीता जयंती उत्सवानिमित्त ते बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. राजेंद्र भाला तर विजय चाटूपले, ज्योती ठाकूर, निर्मला उपाध्ये, राजेंद्र कळकटे, केदार मंत्री, सदाशिव उपाध्ये, दीपक ठाकूर, श्रीमंत शेळके आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती. विजय चाटूपळे यांनी गीतेतील एकेक अध्याय म्हणजे आपल्या जीवनात पडलेल्या प्रश्नाचे उत्तर होय. पाच हजार वर्षांपूर्वी श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली आहे. संत ज्ञानेश्वर यांनी ८०० वर्षांपूर्वी गीताभ्यास केला व त्यांना गीतेचा सार कळला व सर्वांना समजावी म्हणून सोप्या भाषेत लिहिली. तसेच विनोबा भावे यांनी देखील अभ्यास करून सोप्या भाषेत मांडली.
श्रीकृष्णाने आजच्या दिवशी अर्जुनाला भगवद्गीता सांगायला सुरुवात केली म्हणून आजचा दिवस भगवद्गीता जयंती उत्सव म्हणून साजरा करत आहोत असे सांगितले. श्रीमंत शेळके म्हणाले, गीता हा जीवनाचा ग्रंथ असून जीवन हा संग्राम आहे व त्यावरील उपाय म्हणजे भगवद्गीता होय आणि ही गीता श्रीकृष्णाने रणांगणावर सांगितली आहे.अध्यक्षीय समारोपामध्ये बोलतांना राजेंद्र भाला यांनी सर्व विद्यार्थ्यांनी गीतेचे अध्याय पठण करावेत विचारात्मक करावेत जीवनात उतरवावेत असे सांगितले. यावेळी इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी भगवद्गीतेतील बाराव्या अध्यायाचे सामूहिक पठण केले. शेवटी भगवद्गीतेची आरती घेण्यात आली. सूत्रसंचालन रागिणी भाले यांनी तर प्रतिभा आजबे यांनी आभार मानले. कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते मिठाईचे वाटप करण्यात आले.
भगवद्गीता हा प्रगतीकडे घेऊन जाणारा विचार भगवद्गीता म्हणजे श्रेष्ठ विचार, प्रगतीकडे जाणारा विचार, त्याचे जो पूजन करेल तो जीवनात यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. मन समर्थ असेल तरच त्याच्याकडून सामर्थ्यशील कामगिरी करण्याचे कार्य होते आणि म्हणूनच मनाला समर्थ करायचे असेल तर भगवद्गीता आपण अभ्यासली पाहिजे. तो विचार आपण आपल्या जीवनात उतरवला पाहिजे असे निर्मला उपाध्ये म्हणाल्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.