आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बैठक:पारध खुर्द उपसरपंचपदी भागवत लक्कस; गुरुवारी सकाळी दहा वाजता पार पडली निवड प्रक्रिया

पारध9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोकरदन तालुक्यातील पारध खुर्द ग्रापंचायतच्या उपसरपंचपदी भागवत दौलत लक्कस यांची निवड झाली असून.या चुरशीच्या निवडणुकीत भागवत लक्कस यांना सहा मते मिळाली तर विरोधी पराभूत उमेदवार रामेश्वर लक्कस यांना शून्य मते मिळाली.

गुरुवारी सकाळी दहा वाजता पारध खुर्द ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच रुख्मणबाई लक्कस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात येऊन या बैठकीत ही अटीतटीची निवडणूक प्रक्रिया ग्रामसेवक संजय शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडली.

यावेळी झालेल्या निवडीत भागवत लक्कस यांचे पारडे जड भरले. बहुमत अधिकचे मिळाल्याने त्यांची निवड झाली. त्यांच्या निवडी बद्दल त्यांचे आण्णा लक्कस, रमेश लक्कस, मुकेश लक्कस, नाना लक्कस, संजय लक्कस, ईनुसशाह मदार, ज्ञानेश्वर लक्कस, भिकू लक्कस, राजधर लक्कस, हाफीज सादिक साहब, नारायण पवार,पंढरीनाथ घुसळे आदींनी अभिनंदन केले आहे.

बातम्या आणखी आहेत...