आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरपंच संसद:सरपंच संसदेच्या मराठवाडा अध्यक्षपदी भाऊसाहेब घुगे

जालना17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एमआयटी राष्ट्रीय सरपंच संसदेच्या मराठवाडा अध्यक्षपदी नाम फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक तथा शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब घुगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पुणे येथे एम.आय.टी राष्ट्रीय सरपंच संसदेच्या दोन दिवसीय अधिवेशनात शनिवारी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांच्या हस्ते नियुक्ती पञ देऊन गौरव करण्यात आला. या वेळी एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष राहुल कराड, प्रदेशाध्यक्ष योगेश पाटील, राज्य समन्वयक प्रकाश महाले, कार्यवाहक व्यंकटेश जोशी, ज्ञानेश्वर बोडके, अनिल दधीच, महाराष्ट्र संघटक नामदेवराव गुंजाळ, ग्रामविकास समितीचे प्रमुख बाजीराव खैरनार यांच्यासह महाराष्ट्रातील ३४ जिल्हाध्यक्ष व जिल्हा समन्वयक महिला आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

या नियुक्तीबद्दल शिवसेना उपनेते अर्जुन खोतकर, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आमदार नारायण कुचे, युवा सेना राज्य कार्यकारिणी सदस्य अभिमन्यू खोतकर, पंडित भुतेकर, जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल आदींनी अभिनंदन केले आहे. दरम्यान, आपल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन एम. आय. टी. चे प्रमुख विश्वनाथ कराड, राहुल कराड व योगेश पाटील यांनी मराठवाड्याची जवाबदारी आपल्या वर सोपवली. मिळालेल्या पदाच्या माध्यमातून विभागातील सर्व तालुक्यांतील गावांची निवड करून सी. एस. आर. निधीद्वारे खेडी सुजलाम, सुफलाम करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मराठवाडा विभाग प्रमुख घुगे म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...