आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभोकरदन तालुक्यातील ३२ पैकी २ ग्रामपंचायती बिनविरोध तर २ सरपंच आणि ४५ सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे. या शिवाय केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे मुळगाव असलेली जवखेडा खुर्द ही ग्रामपंचायत गेल्या ३० वर्षांपासून बिनविरोध होण्याची प्रथा होती. मात्र जवखेडा खुर्द येथे या निवडणुकीत मोडीत निघाली आहे. ४ सदस्यांची बिनविरोध निवड झाली असुन सरपंच आणि ३ सदस्य जागेसाठी येथे निवडणुक होणार आहे. तर मनापूर या गावात माजी सभापती लक्ष्मण दळवी यांच्या शब्दाला मान आहे. या निवडणुकीत माजी सभापती लक्ष्मण दळवी, रमेशसेठ दळवी यांनी मनापुर ग्रामपंचायत बिनविरोध करुन ३० वर्षांची परंपरा कायम ठेवली आहे. तसेच भिवपुर येथे सरपंचपदासह ९ सदस्यांची बिनविरोध निवडून करण्यात आली.
दरम्यान खामखेडा येथे सरपंचासह ८ सदस्य बिनविरोध झाले असुन येथे एक सदस्य जागेसाठी निवडणुक होणार आहे. गोकुळ येथे सरपंचपद बिनविरोध तर ग्रा.पं.सदस्यांसाठी निवडणुक होणार आहे. जयदेवाडी येथे ४ , वालसा डावरगाव येथे ३, पद्मावती येथे ३, निबोंळा ३ सदस्यांची बिनविरोध निवड झाली. या ग्रामपंचायतीमध्ये कोठाकोळी १ सदस्य, नांजा/क्षीरसागर १, लतीफपुर/फुलेनगर १ सदस्य बिनविरोध निवड करण्यात आली. एकुणच भोकरदन तालुक्यातील ३२ पैकी २ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असुन ३० ग्रामपंचायत आता निवडणुका होणार आहेत. यात सरपंचपदासाठी ३२ पैकी २८ तर सदस्यपदासाठी २६४ पैकी २१९ असे एकुन २४७ जागेसाठी निवडणुक होणार असुन यासाठी ५३३ रिंगणात उमेदवार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.