आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्मचारी:भोकरदन : 30 ग्रा.पं.साठी 95 मतदान केंद्रे, 547 कर्मचारी

भोकरदन2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुक प्रक्रियेतील केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांचे प्रशिक्षण देण्यात आले. भोकरदन तालुक्यातील ३२ पैकी २ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असुन ३० ग्रामपंचायतीसाठी ९५ मतदान केंद्रांसाठी केंद्राध्यक्ष १३०, मतदान सहाय्यक अधिकारी १३० आणि इतर मतदार अधिकारी २८७ असे एकुन ५४७ कर्मचारी नियुक्त केले आहेत. केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी १, २ व ३ यांना प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी ईव्हीएम मशीन, व्हीव्हीपॅट मशीन आणि मतदान प्रक्रियेबाबतची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार डॉ. सारिका कदम यांनी दिली.

या प्रशिक्षणाला निवडणूक पथकातील सुमारे ५४७ कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला. निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार डॉ.सारिका कदम यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रशिक्षण घेण्यात आले. यावेळी भोकरदन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे रविंद्र देशपांडे, तायडे यांनी मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणात ईव्हीएम मशीन हाताळण्यासंबंधीचे प्रात्यक्षिक दिले. मतदान केंद्राध्यक्षांसह मतदान अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले. शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांनी निवडणुकीत चोख कर्तव्य बजावून ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडावी असे आवाहन केले.

बातम्या आणखी आहेत...