आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:भोकरदन महा ई सेवा केंद्रचालकांचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन

भोकरदनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात संग्राम केंद्राच्या आयडी ही नियमानुसार ग्रामपंचायतीसाठी असतांना नियमबाह्य पद्धतीने भोकरदन येथे सुरू आहे. त्यामुळे संग्राम केंद्राच्या आयडीची चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी महा ई सेवा केंद्रचालकांच्या वतीने उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली आहे.

तालुक्यातील संग्राम केंद्रांना परवानगी देण्यात आलेल्या ठीकाणी केंद्र काम होत नाही. सदरील संग्राम केंद्र हे ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी देण्यात आले असुन ज्यामुळे ग्रामीण भागातील नागरीकांचे कामे वेळा गावातच पुर्ण व्हावीत. परंतु प्रत्यक्ष केंद्र चालक हे दिलेल्या ठिकाणी केंद्र न चालवता इतर ठिकाणी चालवत आहे. याबाबत चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी महा ई सेवा केंद्र चालक दिपक बोर्डे, सत्यवान जंजाळ, अमोल जाधव, कैलास रजाळे, समाधान तेलंग्रे, उषा शेजुळ, विनोद पठाडे, कृष्णा भोंबे, एकनाथ पांडव आदींनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...