आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आनंदोत्सव:भाजपच्या विजयाचा भोकरदन, टेंभुर्णीत कार्यकर्त्यांनी पेढे वाटून केला आनंदोत्सव

भोकरदन25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने तिन्ही जागेवर विजय संपादन केल्यामुळे भोकरदन येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात कार्यकर्त्यांनी फटाके फोडुन जल्लोष साजरा केला. यावेळी नगरसेवक राहुल ठाकूर, सतिष रोकडे, संजय देशपांडे, सुभाष दळवी, छगन दळवी, वाजेद शहा, ज्ञानेश्वर तळेकर, नारायण तळेकर, रामेश्वर चिकटे, विनय पालकर आदींची उपस्थिती होती. भारतीय जनता पक्षाकडे कमी आमदारांचा पाठींबा असतांनासुध्दा महाविकास आघाडीच्या विरोधात देवेंद्र फडणवीस यांच्या कुशल नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने मोठा विजय संपादन केला आहे.

अपक्ष आमदारांनी सत्ताधारी महाविकास आघाडीच्या विरोधात मतदान करुन महाविकास आघाडीच्या सरकार वर व नेतृत्वावर विश्वास नसल्याचे दाखवुन दिले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात जरी महाविकास आघाडीचे सरकार असले तरी जनमाणसांत व अपक्ष आमदारामध्ये महाविकास आघाडी सरकारने विश्वास अर्हता गमावली असुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास असल्याचे या निवडणुकीतुन सिध्द होत आहे. हा विजय पंतप्रधान नरेंद्र मोदी व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करणारा असल्याची प्रतिक्रीया केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे, भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार संतोष दानवे यांनी दिली.

टेंभूर्णीत फटाके फोडले
राज्यसभेच्या तीन जागांवर भाजप आणि अनपेक्षित विजय मिळवल्याने टेंभुर्णी येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जिल्हा परिषद सदस्य शालिकराम म्हस्के, भाजपा शहराध्यक्ष राजू खोत, उपसरपंच संतोष पाचे, दत्ता सोनसाळे, फैसल चाऊस, संजय राऊत, अलकेश सोमाणी, ज्ञानेश्वर उखर्डे, संदीप मुळे, धीरज काबरा, सर्जेराव कुमकर, बाबुराव जाधव, प्रदीप काबरा, दीपक जमदाडे, सुरेश सोळुंके, शरद गायमुखे, राम गुरव, दीपक देशमुख, बाळू देशमुख, बबलू देशमुख, दत्तू पंडित, मधुकर देठे, मनोज शिंदे आदींची उपस्थिती होती.

भारतीय जनता पार्टीवर विश्वास असल्याने दिवसेंदिवस भाजपच्या राजकीय कारकिर्दीला उज्वल यश संपादन होत आहे. राज्यसभेच्या तीन जागा भाजपने जिंकून विजयावर शिक्कामोर्तब केले असल्याचे जिल्हा परिषद सदस्य म्हस्के यांनी सांगितले. दरम्यान, पारध येथेही कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत भाजपाच्या विजयाचा आनंद साजरा केला. यावेळी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...