आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभोकरदन जाफराबाद रोडवर बांधकाम सुरू असलेल्या केळणा नदीच्या पुलावर वाहतूक जाम झाली व मिळालेली संधी व गर्दीचा फायदा घेत अट्टल गुन्हेगार पाठलाग करणाऱ्या परभणी पोलिसांच्या तावडीतून निसटले. दरम्यान एटीएम फोडणाऱ्या आरोपी बरोबर पोलिसांची चकमक होऊन एटीएम चोर व पोलिसात गोळीबारची चर्चा भोकरदन शहरात आहे.
बुधवारी 16 जून रोजी दुपारी साडे बारा ते एक वाजेच्या दरम्यान भोकरदन शहरातील जाफराबाद रस्त्यावरील केळना नदीवर असलेल्या पुलावर वाहतूक ठप्प झाली होती. याच दरम्यान एक कार भरधाव वेगात पुढे आली. पाठोपाठ एक जीपसुध्दा आली. या वाहनांनी पूल ओलांडला तोच एक पोलिस कर्मचारी जीपमधून उतरला आणि त्याने कारच्या दिशेने गोळी झाडली. त्यापूर्वी कारमधील एकाने पोलिसांच्या दिशेने गोळी झाडल्याची चर्चा आहे. मात्र, उपस्थित नागरिकांना गाडीचे टायर फुटले असेल अशी शंका वाटली. परंतु, पोलिसांच्या गोळीबारामुळे काहीतरी गडबड असल्याचे लक्षात येताच नागरिकांनी धावपळ केली.
परभणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस पथक परराज्यातील एटीएम फोडणाऱ्या टोळीचा पाठलाग करत असताना हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. आरोपींनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार केल्यानंतर पोलिसांनी प्रतिउत्तरात गोळीबार केल्याचे समजते. याशिवाय यातील काही आरोपी भोकरदन येथे गाडीतून उतरल्याची चर्चा आहे. यासंदर्भात भोकरदनच्या पोलिस सूत्रांनी सांगितले की, नेमके प्रकरण काय आहे हे सांगता येणार नाही. मात्र, जिंतूर येथील परिविक्षाधीन आयपीएस अधिकारी डॉ. श्रवण दत्त यांनी भोकरदन पोलिसांनी संबंधित पोलिसांना मदत करण्याचा फोन केला होता.
भोकरदन शहरात या गोळीबाराच्या घटनेनंतर उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. कोणी गुन्हेगारांच्या टोळीचे वाटाघाटीवरून वाद झाले तर कोणी म्हणते एटीएम फोडणाऱ्या टोळीमधील हे चोरटे होते. केळणा नदीवरील पुलाच्या कामामुळे तेथे झालेल्या वाहनांच्या गर्दीचा ट्राफिक जामचा फायदा घेत ते चोरटे, परभणी पोलिसांच्या हातून अट्टल गुन्हेगार सुटल्याची चर्चा आहे. कारण वाहतूक जाम झाल्याने पोलिसांची गाडी अडकली आणि चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले.
याआधी चार ते पाच वर्षा पूर्वी भोकरदन शहरातील एसबीआय बँकेचा एटीम चोरून नेताना मध्यरात्री चोरट्याने गस्तीवर असलेल्या पोलिसावर फायर करून ते चोरटे फरार झाले होते. ज्या कारवर फायरींग झाले त्या कारची सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी हस्तगत केले आहे.
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, परभणी येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एटीम फोडणाऱ्या परराज्यातील टोळीचा बुधवारी औरंगाबाद येथून पाठलाग करत होते. पाठलागादरम्यान ही टोळी भोकरदन शहरातील जाफराबाद मुख्य रस्त्यावरील केळना नदीच्या पुलाजवळ थांबल्याची माहिती या पथकाला मिळाली. यावेळी टोळीतील आरोपींपैकी काही जण शहरात काहीतरी खरेदीसाठी उतरले. तर चार चाकी वाहनात असललेल्या संशयित आरोपीला पोलिस मागावर असल्याचे समजताच त्याने वाहनातील आरोपींनी वाहन भरधाव वेगाने पळवण्यास सुरवात केली.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.