आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाईची मागणी:स्वराज्य संघटनेकडून भोकरदनला राज्यपाल, त्रिवेदी यांचा निषेध

भोकरदन11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील बरंजळा लोखंडे येथे भगतसिंग कोशारी व सुधांशी ित्रवेदी यांनी अखंड हिंदुस्थानाचे दैवत छत्रपती शिवराय यांच्यावर अपमानकारक बैताल वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यात आला. तसेच भोकरदन तहसील कार्यालयात नायब तहसीलदारांना निवेदन देऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल वक्तव्य करणाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली.

या प्रसंगी स्वराज्य संघटना निमंत्रक विकास भाऊ जाधव यांनी छत्रपती शिवरायांच्याविषयी अपमानकारक वक्तव्य, अवमानकारक चित्रपट निर्मिती करणाऱ्या सर्वच व्यक्तींवर कठोर कारवाई करावी, असे सांगितले. कोणतीही व्यक्ती किंवा समाज माध्यम असो यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होणार नाही, याची सर्वांनी काळजी घ्यावे असेही जाधव म्हणाले.

यावेळी सुरज मव्हारे, दीपक जाधव, अमोल खांडवे, कृष्णा लोखंडे, समाधान लोखंडे, शिवलाल जावळे, विठ्ठल लोखंडे, माधवराव लोखंडे, कुंडलिक दाहीजे, गुलाबराव लोखंडे, ज्ञानेश्वर लोखंडे, बाबासाहेब लोखंडे, उत्सव लोखंडे, प्रदीप लोखंडे, गणपत लोखंडे, गणेश लोखंडे, भागवत लोखंडे यांच्यासह बरंजळा लोखंडे येथील शिवपप्रेमींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...