आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:भोकरदन तालुका कृषी अधिकाऱ्यांचे शेतकऱ्यांना आवाहन ; घरात जतन केलेले सोयाबीन बियाणे खरीप पेरणीसाठी उपयोगात आणावे

प्रपिंपळगाव रेणुकाई24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गतवर्षी खरिपात अनेक शेतकऱ्यांनी कृषी सेवा केंद्रातुन नामाकींत सोयाबीन खरेदी करुन खरिपाची पेरणी पूर्ण केली. परंतु पेरणी नंतर अनेक ठिकाणी सोयाबीनचे बियाणेच जमिनीतुन उगवल्या नसल्याच्या असंख्य तक्रारी शेतकऱ्यांच्या होत्या. यासाठी यंदा खरिपातील उत्पादीत सोयाबीन बियाणे ज्यांच्याकडे उपलब्ध आहे.त्यांनी तालुका कृषी सहाय्यक यांच्याकडून तपासणी करुन खरीप पेरणीसाठी घरातील जतन केलेले सोयाबीन बियाणाचे पेरणीसाठी उपयोगात आणण्याचे आवाहन भोकरदन तालुका कृषी अधिकारी रामेश्वर भुते यांनी केले आहे.

याबाबत कृषी खात्याकडून मार्गदर्शन देखील करण्यात येत असून यंदा तालुक्यात सोयाबीन पेरा वाढणार असल्याचे चिञ प्राप्त परिस्थितीवरुन दिसत आहे. भोकरदन तालुक्यातील शेतकरी कमी खर्चात अधिक उत्पादन देणारे पिक म्हणून तसेच मका पिकाला लागणारा अधिकचा खर्च हा सर्व ताळमेळ बघता मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकाकडे मागील तीन वर्षापासून वळला आहे. यावर्षी हंगामात जवळजवळ तालुक्यात सोयाबीनचा पेरा वाढणार असल्याचा अंदाज आहे.

दरम्यान २०२२-२३ या खरिप हंगामात जवळजवळ २७ हजार हेक्टरच्या वर सोयाबीन पिकाची लागवड केली जाणार आसुन त्या दिशेने कृषी खात्याकडून देखील उपाययोजना राबविण्यात येणार असल्याचे कृषी खात्याने सांगितले आहे. गतवर्षी सोयाबीन सोंगणीच्या वेळी परतीच्या पावसात सोयाबीन पिकांचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे शेतातील बियाणे हे लागवडीसाठी उपयुक्त नसल्याने बियाणाचा तुडवडा निर्माण झाला होता.

शिवाय अनेक शेतकऱ्यांनी कंपनीचे थैलीचे बियाणे पेरले होते. या अनुषंगाने शेतकऱ्यांना आगामी काळात खरिप पेरणीसाठी सोयाबीन बियाणाचा तुडवडा पडू नये म्हणून घरातीलच बियाणे शेतकऱ्यांनी जतन करुन ठेवावे जेणे करुन वेळेवर पेरणीच्या काळात शेतकऱ्यांची बियाणासाठी धावपळ होणार नाही. यासाठी कृषी विभागाकडुन मार्गदर्शन करण्यात येत आहे.

दरम्यान ज्या शेतकऱ्यांकडे बियाणे घरी साठवून आहे, त्यांनी खरीप हंगामाकरीता सोयाबीन बीयाणाची उगवण क्षमता तपासणी करुन घ्यावी व त्यानंतर आपल्याच गावातील शेतकऱ्यांना साठवून ठेवलेले सोयाबीनचे बियाणे खरिप हंगामात पेरणीकरता उपलब्ध करुन द्यावे असे आवाहन तालुका कृषी अधिकारी रामेश्वर भुते यांनी शेतकऱ्यांना केले आहे. गतवर्षी शेतकऱ्यांना अकरा हजार रूपये प्रति क्विंटल प्रमाणे बियाणे खरेदी करावे लागले.त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांनी सावध पविञा घेत घरचेचे सोयाबीन बियाणे पेरणीसाठी जतन करुन ठेवले आहे.

मका लागवडीकडे पाठ
मागील दोन ते तीन वर्षापासून मोठ्या प्रमाणात मक्याची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनी मका पिकावर वाढत्या रोगाचा प्रादुर्भाव व लागवडीपासुन ते काढणी पर्यंतचा खर्च पाहता सोयाबीन पिकाला आपली पसंती देत मका लागवडीकडे पाठ फिरवली आहे. यावर्षी रब्बीत देखील शेतकऱ्यांनी मकाचे अल्प उत्पादन घेतले असुन हरभरा पिकाचा पेरा मोठ्या प्रमाणात घेतला आहे.

आता पावसाची प्रतीक्षा
यावर्षी सुरूवातीला पावसाळा दहा दिवस अगोदर सुरू होण्याचे भाकीत दिले होते. परंतु अद्यापही पावसाचे वातावरण तयार झालेले दिसत नाही. शेतकऱ्यांनी खरीप पेरणीसाठी पैशाची जुळवाजुळवा करीत पेरणीसाठी शेती तयार करुन ठेवली आहे. तर अनेक शेतकरी अद्यापही पेरणीसाठी पैशाच्या शोधात फिरताना दिसत आहे. बँकानी शेतकऱ्यांना पेरणीसाठी पिक कर्ज उपलब्ध करुन देण्याची मागणी आहे.

बातम्या आणखी आहेत...