आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रीडाजगत:भोकरदन तालुकास्तरीय मुलींच्या खो-खो स्पर्धा

भोकरदन2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे महाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी जालना व जिल्हा परिषद जालना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भोकरदन येथे तालुकास्तरीय स्पर्धेत मुलींचे खो-खो चे सामने नूतन विद्यालयाच्या क्रीडा मैदानावर संपन्न झाले.

या सामन्याचे उद्घाटन क्रीडा संयोजक कृष्णा जंजाळ यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेत भोकरदन तालुक्यातील विविध शाळा व महाविद्यालय मिळून एकूण ३८ संघ सहभागी झाले होते. अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात १४ वर्ष वयोगटातील स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यालय देहेड यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बरंजळा यांनी दुसरा क्रमांक मिळविला. १७ वर्षे वयोगटातील मुलींच्या सामन्यात दुर्गामाता माध्यमिक विद्यालय सोयगाव देवी यांनी राजश्री शाहू महाराज विद्यालय कोसगाव यांच्या संघावर विजय मिळवत प्रथम क्रमांक पटकावला, तर राजश्री शाहू महाराज विद्यालय कोसगाव यांना द्वितीय क्रमांकावर समाधान मानावे लागले.

तसेच १९ वर्ष वयोगटातील सामना शारदा विद्या मंदिर व उच्च माध्यमिक विद्यालय वरुड यांनी मिळविला तर श्री रामेश्वर कनिष्ठ महाविद्यालय भोकरदन यांना द्वितीय क्रमांकावर समाधान मानावे लागले. सदरील स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रा.अशोक नवगिरे, क्रीडा मार्गदर्शक किरण साळवे, नितेश बोर्डे, आर. पी. पालकर, एम. यु. नरोटे, एस. एस. वळवी, गौतम खाडे, सुनील जंजाळ, राठोड, गायके, जाधव यांच्यासह आदींनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...