आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्य तपासणी:भोकरदनला 93 मुलांची हृदयरोग तपासणी

भोकरदन2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत भोकरदन येथे ९३ मुलांची हृदयरोग तपासणी करण्यात आली.जालना जिल्ह्यात राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात सुमारे ३२ पथकाद्वारे अंगणवाडीत शिकणाऱ्या जन्मजात ते सहा वर्षे वयोगटातील मुलांची तसेच शाळेमध्ये सहा वर्षे ते अठरा वर्षे व या गटातील मुलांची आरोग्य तपासणी केली जाते.

या पथकांमध्ये वैद्यकीय अधिकारी पुरुष वैद्यकीय अधिकारी महिला, औषध निर्माण अधिकारी तसेच आरोग्य सेविका यांच्यामार्फत जिल्ह्यातील सर्व शाळा मध्ये वर्षातून एकदा व अंगणवाडीमध्ये वर्षातून दोनदा मुलांची तपासणी करण्यात येते.

ही तपासणी करत असताना गंभीर स्वरूपाचे आजार असलेल्या मुलांना राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत कार्यरत पद्धती हे खेडोपाडी आणि वाडी वस्त्यांवर जाऊन या मुलांची प्राथमिक तपासणी करत असतात जालना येथील सामान्य रुग्णालयामध्ये पुणे येथीलकार्डिंयालॉजिस्ट डॉ. पंकज सुगावकर यांनी बालकांची मोफत तपासणी केली. या तपासणीमध्ये टू डी इको मशीनच्या सहाय्याने बालकांच्या हृदयात असलेल्या आजारांची तपासणी करण्यात आली. यापूर्वी देखील असे अनेक शिबिर पार पडले आहेत. या शिबिरात मुख्यत्वे करून बालकांच्या छातीला असलेले छिद्र आणि त्यावर पुढील उपचार करणे हे या शिबिराचे उद्दिष्ट असल्याचे डॉ. सुगावकर यांनी सांगितले.

एकूण १२३ मुलांची नोंदणी करण्यात आली होती आणि त्यापैकी ९३ मुलांची हृदयाची तपासणी २ डी इको करण्यात आली असून या मुलांना जर शस्त्रक्रियेची गरज असेल तर यांना पुढील शास्त्रक्रियेसाठीसंदर्भित करण्यात येईल, असे सांगण्यात आले.

या तपासणी शिबिरासाठीजिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्चना भोसले, अति जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. गायके, डॉ. सोनखेडकर यांच्या नेतृत्त्वाखाली जिल्हा पर्यवेक्षक राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम विद्या म्हस्के, डॉ. मीनल देवळे, डॉ. अवचार, डॉ. सचिन अमडकर, डॉ. अंकुश डोंगरे, डॉ. सचिन दहिवाल, राजू खिल्लारे, तेजस्वनी वाघमारे, जयस्वाल, वर्षा निर्मल, अनिता नागे, सीमा गवळी, ममता ढाले यांच्यासह आदींनी सहकार्य केले.

बातम्या आणखी आहेत...