आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड:भोकरदनच्या चार खेळाडूंची महाराष्ट्र लीगसाठी निवड

भोकरदनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील स्व. अॅड. भाऊसाहेब देशमुख वरिष्ठ महाविद्यालय जोमाळा-भोकरदन मधील बी ए प्रथम वर्षाचा विद्यार्थी समीर शेख, करण सिंग राजपूत , फरहान शेख, हर्षवर्धन गावंडे या चार खेळाडूची महाराष्ट्र क्रिकेट लीग साठी निवड करण्यात आली.

मुंबई, नागपूर व पुणे येथे महाराष्ट्र क्रिकेट लीग चे विविध सामने खेळले जाणार आहेत. महाविद्यालयातील फलंदाज समीर शेख, यष्टीरक्षक करणसिंग राजपुत्र , जलद गोलंदाज फरहान शेख, फलंदाज हर्षवर्धन गावंडे हे खेळाडू अमरावती, औरंगाबाद व पुणे येथे झालेल्या चाचणी सामन्यातून त्यांची क्रीडा कौशल गुणवते वरून निवड करण्यात आली. या निवडीबद्दल त्यांचे त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राजाभाऊ देशमुख, अमृतराव देशमुख, अनिल देशपांडे, तुषार पाटील, इंद्रजीत देशमुख, प्रतिक देशमुख, प्राचार्य डॉ. विश्वास तळेकर, उपप्राचार्य एच. व्ही. नागरगोजे, प्रशासकीय अधिकारी सोपान सपकाळ, प्रा. समाधान नवल, रोषण देशमुख, बाबासाहेब खिल्लारे, सतीश दळवी, संतोष लोखंडे, गुणरत्न मगरे, नितीन दळवी आदींची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...