आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजालना तालुक्यातील नाव्हा येथे माजी आमदार अरविंदराव चव्हाण यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या सभागृहाचे भूमिपूजन गुरुवारी चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी सरपंच कैलास भुतेकर होते. आपल्या आमदारकीच्या कार्यकाळात समाजातील काही प्रश्न कमी करण्याचे काम केले. पाणी प्रश्न कमी व्हावेत म्हणून मतदारसंघात साठवण तलाव करण्यावर जास्त भर दिला.
विकासामध्ये पक्षीय राजकारण येऊ न देता सर्वांना सोबत घेऊन विकासकामे करण्याचा प्रयत्न केला असल्याचे अरविंदराव चव्हाण म्हणाले. या वेळी विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन विष्णू भुतेकर, लक्ष्मण कुलकर्णी, उपसरपंच अनिल सरकटे, रमेश अग्रवाल, अशोक भुतेकर, आनंद शिंदे, दिलीप क्षीरसागर, विष्णू घुले, गणेश भुतेकर, सुभाष भुतेकर, कारभारी भुतेकर, किशोर सवडे, भगवान दाभाडे, मारोती भुतेकर, नानाभाऊ सुरवसे, माणिकराव भुतेकर, बालुकाका उगले, भगवान उगले, रमेश सावजी, राम भुतेकर, प्रभाकर तुपकर, उमेश सपकाळ, उत्तम भुतेकर, भरत भुतेकर यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ, कार्यकर्ते आदी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.