आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विकास:जामखेड गटात 87 लाखांच्या कामांचे भूमिपूजन

जामखेड5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जामखेड गटात मंजूर करण्यात आलेल्या ८७ लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन सोमवारी करण्यात आले. या विकास कामामुळे गावांची प्रगती होण्यास मदत होणार आहे. दरम्यान, या कामांसाठी आ. नारायण कुचे यांनी पुढाकार घेतला आहे.

या वेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष दीपक ठाकूर, अवधूत नाना खडके, भाजपा तालुकाध्यक्ष जितेंद्र पालकर, माजी सभापती भीमराव डोंगरे, भगवान भोजने, गुलाब अण्णा पागिरे, सचिन जाधव, परमेश्वर लेंभे, भीमराव पवार, डॉ. गंगाधर पांढरे, हरिचंद्र भोजने,दीपक पांढरे,तसेच जामखेड गटातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या भूमिपूजनामध्ये जामखेड येथील ऐतिहासिक खडकेश्वर महादेव मंदिर येथील सभागृह, माळी गल्ली येथील सिमेंट रस्ता, पंचमुखी गणपती मंदिर सभा मंडप, धनगर गल्ली येथील सिमेंट रस्ता, विठ्ठलवाडी येथे जलजीवन मिशन अंतर्गत ४० लाखांची कामे तसेच शिरनेर येथे दहा लाखांच्या रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी शिरनेरच्या असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. उपसरपंच रंजीत वैराळ, विष्णू मंडलिक, माजी सरपंच पाराजी वैद्य, सोनाजी गायकवाड तसेच जामखेड येथेही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भीमराव डोंगरे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. काँग्रेसचे तुकाराम सांगुळे, बापूरावजी धुळे तसेच राष्ट्रवादीचे गंगाधर पांढरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

जितेंद्र पालकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या सर्वांचे अभिनंदन आणि स्वागत केले. त्याचबरोबर अंबड तालुका आणखी मजबूत करण्याचा मनोदय व्यक्त केला.त्याचबरोबर जामखेडच्या मुख्य रस्त्याची मागणी केली. या रस्त्याला लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन आमदार नारायण कुचे यांनी दिले. यापुढेही जामखेड गटात विकास कामांना निधी कमी पडू देणार नाही, असेही आमदार नारायण कुचे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...