आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्घाटन:शंभर खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचे टोपेंच्या हस्ते भूमिपूजन; घनसावंगीच्या आरोग्य विकासात पुन्हा पडली भर

तिर्थपुरी18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

घनसावंगी येथे शंभर खाटांचे उपजिल्हा रुग्णालयाचे आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री तथा पालकमंत्री राजेश टोपे यांच्याहस्ते रविवारी भूमिपूजन करण्यात आले.

वर्षभरात जनतेच्या सेवेत कार्यान्वित होणारे येथील हॉस्पिटल हे जिल्ह्यात सर्व सोयीने सुसज्य असे आदर्श हॉस्पिटल असणार असल्याचे टोपे यांनी यावेळी सांगितले. यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, पोलीस अधिक्षक डॉ. अक्षय शिंदे, तहसीलदार नरेंद्र देशमुख, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्चना भोसले, कार्यकारी अभियंता मधुसूदन कांडलीकर, माजी नगराध्यक्ष नंदकुमार देशमुख, पंचायत समितीचे माजी सभापती तात्यासाहेब चिमणे, तिर्थपुरीचे उपनगराध्यक्ष शैलेंद्र पवार, भागवत रक्ताटे, कल्याण सपाटे, बन्सीधर शेळके, पांडुरंग कथले, रमेश धांडगे, नकुल भालेकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आरोग्यमंत्री टोपे पुढे म्हणाले की. फक्त हॉस्पिटल उभारून आपण थांबणार नसून या हॉस्पिटलमध्ये जवळपास १२० डॉक्टरांची टीम कार्यरत राहण्यासाठी सर्व पदे भरणार असून या हॉस्पिटलमध्ये सिटीस्कॅन मशीन, एक्सरे मशीन, मॉड्युलर शस्त्रक्रिया वीभाग यासह इतर अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्य असे हे जिल्ह्यातील आदर्श हॉस्पिटल राहणार तसेच येथे संपूर्णपणे मोफत उपचार करण्यात येणार असल्याने गोरगरीब जनता तर येथे येईलच परंतु श्रीमंत लोक देखील येथे उपचार घेण्यासाठी येतील असे हे हॉस्पिटल राहणार असे ते म्हणाले. हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांची उपस्थिती राहिली तर या हॉस्पिटलचा फायदा होईल नसता नाही, त्यासाठी हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांची उपस्थिती राहण्यासाठी बायोमेट्रिक यंत्रणा बसवण्याच्या सूचना संबंधितांना आरोग्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

घनसावंगी येथील शंभर खाटांचे हॉस्पिटल तर होईलच परंतु त्याचबरोबर अंबडला शंभर खाटांचे उपजिल्हारुग्णालय तसेच तिर्थपुरी व अंकुशनगर येथे पन्नास खाटांचे ग्रामीण रुग्णालयांची उभारणीच्या कामाचे लवकरच भूमीपूजन करणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. प्रास्ताविक डॉ. अर्चना भोसले यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...