आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील आठवडी बाजारात भाजीपाल्यांच्या दरात मोठी घसरण झाल्याचे दिसून येत आहे. महिन्यापासून आठवडी बाजारात भाजीपाल्याची आवक वाढू लागल्याने भाजीपाल्याच्या दरामध्ये मोठी घसरण झाल्याचे व्यापारी सांगत आहेत. तालुक्यात यावर्षी पर्जन्यमान समाधानकारक झाल्याने जलसाठ्यात मोठी वाढ झाली. त्यामुळे शेतकरी हंगामी पिकाबरोबर भाजीपाला पिके देखील घेत आहेत. गेल्या महिन्यापासून बाजारामध्ये भाजीपाल्याची आवक वाढत असल्याने भाजीपाला मातीमोल विक्री करावा लागत आहे. भाजीपाल्याचे दर घसरल्यामुळे बाजारात आणण्याचा वाहन खर्च देखील निघत नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. भाजीपाला लागवडीपासून ते काढणीपर्यंत मोठा खर्च होतो.
बाजारात भाजीपाल्याला भाव मिळत नसल्याने भाजीपाला उत्पादक चिंता व्यक्त करत आहेत. दरम्यान,मंठा येथे बाजारात शुक्रवारी भाजीपाल्याची आवक भरपूर झाल्याने वांगी, पातीचे कांदे दहा रुपये प्रति किलो तर गवार, चवळी शेंगा २० रुपये प्रति किलो विक्री झाली. गोबी गड्डा दहा रुपये, पत्ती गोबी गड्डा १५ रुपये, मेथी, पालक ५ रुपये प्रति जुडी विक्री झाली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.