आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेरबंद:दुचाकींची चोरी करणारा जेरबंद

जालना2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना शहरातील विविध भागांतून दुचाकींची चोरी करणाऱ्या चोरट्यास सदर बाजार पोलिसांनी गुरुवारी अटक केली. त्याच्याकडून दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. भरत जनार्दन वाकडे (हातवण, ता. जालना) असे संशयिताचे नाव आहे. शहरातील हयातनगर व आझाद मैदान या परिसरातून दुचाकी चोरी झाल्याची तक्रार सदर बाजार पोलिस ठाण्यात दाखल झाली होती.

या गुन्ह्याचा तपास करीत असताना सदरील दुचाकी भरत वाकडे या संशयिताने चोरल्याची माहिती सदर बाजार पोलिसांना मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी त्या व्यक्तीला ताब्यात घेतले. त्याची विचारपूस केली असता त्याने सदरची दुचाकी कोडी येथील बसस्थानकाजवळ बेवारस सोडून दिल्याचे सांगितले. पोलिसांनी सदरील दुचाकी जप्त केली. त्याच्याकडे अधिक विचारपूस केली असता त्याने हयातनगर येथून व तीन वर्षांपूर्वी टांगा स्टँड येथून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...