आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लढा:बिरसा मुंडा यांनी ब्रिटिशांविरुद्ध व्यापक लढा उभारला : पांडे

भोकरदन25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रिटीशांनी आदिवासींच्या जमीनी हिरावुन घेतल्या होत्या. त्या परत मिळवण्यासाठी मंुडाचे प्रमुख ज्यांना सरदार म्हटले जाते त्यांनी ब्रिटींशाविरुध्द व्यापक लढा उभारुन ‘‘छोटा नागपुर टेनन्सी अॅक्ट’’ मंजुर करुन घेवुन आदिवासींचे जमीनीवरील हक्क मान्य करुन घेवुन आदिवासी समाजास जगण्याचा मार्ग सुलभ करुन दिला असल्याचे जिल्हा परिषद सदस्या आशा पांडे यांनी सांगितले.

भोकरदन येथे गुरुवारी भाजपा आदिवासी मोर्चा जालनाच्या क्रांतिवीर भगवान बिरसा मुंडा यांच्या स्मृति दिननिमित्त आभिवादन करण्यात आले. सकाळी मोटार सायकल रॅली काढण्यात आली. त्यानंतर भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे जिल्हा परिषद सदस्य आशा पांडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांनी भगवान बिरसा मुंडा यांचा जन्म दिन १५ नोव्हेंबर हा आदिवासी गौरव दिन म्हणून साजरा करण्याचे ठरविले असल्याने या निर्णयाचे आदिवासी बंधवानी स्वागत केले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल चिंचपुरे, भाजपा आदिवासी जमाती मोर्चा जिल्हाध्यक्ष गणेश इंगळे, गंगाधर कांबळे, विष्णु सोनुने, एकनाथ लोखंडे, गणेश गाडेकर, अंबादास पवार, समाधान बावस्कर, समाधान शेवाळे, दामू सपकाळ, भगवान गवळी, आत्माराम सुरडकर, फुलसिंग शिंदे, रोहिदास चिकटे, नारायण बावस्कर, डॉ. लक्ष्मण पाडळे आदींची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...