आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिवादन:जिल्ह्यात लोकशाहीर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांना जयंती, तर लोकमान्य टिळकांना पुण्यतिथीपर अभिवादन

जाफराबाद14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

साहित्यरत्न, संयुक्त महाराष्ट्र लढाईतील लोकशाहीर, प्रबोधनकार अण्णाभाऊ साठे यांची १०२ वी जयंती तर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी निमीत्त विविध ठिकाणी अभिवादन करण्यात आले. या निमीत्ताने विविध ठिकाणी शैक्षणीक साहित्य वाटप केले.

दानकुंवर महिला महाविद्यालय
जालना । श्रीमती दानकुंवर महिला महाविद्यालयत साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी निमीत्त अभिवादन केले. या कार्यक्रमाला व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ. विद्या पटवारी व रा. से. यो. कार्यक्रम अधिकारी डॉ. सुधाकर वाघ, प्रा. डॉ. जितेंद्र अहिरराव, डॉ. झेड. बी. काजी, डॉ.स्वाती महाजन व डॉ.बी.जी. श्रीरामे आद्दी उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरुवात महामानवांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादनाने करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीस कु.दिव्या चौधरी हिने पोवाडा सादर केला. त्यानंतर कु अंजली कांबळे, तुळशी मालोदे, कु. सोनाली पारधे व कु. प्रियंका देवडे इत्यादी विद्यार्थिनींनी साहित्यरत्न शाहीर अण्णा भाऊ साठे व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जीवन कार्यावर आपले विचार व्यक्त केले.

अखिल भारतीय सेना
जालना । अखिल भारतीय सेनेच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करताना अखिल भारतीय सेनेचे शहराध्यक्ष अनिल वानखेडे, संतोष गायकवाड, आनंद बोराडे ,दुर्गेश पाचपिंडे, आकाश घाटोळे, लखन मदारे, संतोष गायकवाड, गोरखनाथ जाधव आदी.

भराडखेड्यात अभिवादन
जालना । साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांची १०२ वी जयंती व लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त भराडखेडा ता. बदनापूर येथे अभिवादन करण्यात आले. या वेळी युवासेना जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे, भगवान बारगाजे, बाबासाहेब दराडे, कृष्णा दराडे, रुस्तम मुळक ,शामराव घोरपडे, त्र्यंबक मुळक, सर्जेराव तुपे, प्रकाश शिंदे, सुनील दराडे, विलास तुपे, रामेश्वर दराडे, महिंद्र साबळे, दीपक शिंदे, देविदास घोरपडे, मुकेश आरसूड, बद्री खरमुटे, सुरेश घोरपडे, अनिल घोरपडे यांच्या सह ग्रामस्थांची उपस्थिती होती.

आनंद विद्यालय परतूर
परतूर । येथील आनंद विद्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांना पुण्यतिथी निमीत्त अभिवादन केले.याप्रसंगी इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित नाटीका सादर केली.विद्यार्थांनी आपल्या भाषणांमधून दोन्ही महापुरुषांचा जीवनावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक संजय कदम, प्रमुख पाहुणे श्रीमती रूपाली नंदीकोले उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन धनश्री काळे व इशिका बारसकर यांनी तर आभारप्रदर्शन पवन माकोडे याने केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अनिता हिवाळे, रमेश कदम,उदिता उपाध्याय, अनुजा गारकर, माऊली ढेरे, सुमंत भांडवलकर, रमेश लुलेकर, सीमा सातोनकर, सुरेखा यादव, कविता गुंजकर, वर्षा निकम, शारदा हिसाळकर, विक्रम भांडवलकर, भारत मंडपे आदींनी परिश्रम घेतले.

ग्रा.प.ं जळगाव सोमनाथ
रामनगर । जालना तालुक्यातील जळगाव (सोमनाथ) ग्रामपंचायत कार्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी निमीत्त अभिवादन केले. ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्या वतीने पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले यावेळी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व गावातील नागरिक उपस्थित होते.

राजर्षी शाहू इंग्लिश स्कूल
जालना । चौधरी नगर येथील भिलदरी बहुउद्देशीय संस्थेचे राजर्षी शाहू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व स्वातंत्र्य सेनानी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी निमीत्त अभिवादन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिजित भंडारे यांनी केले तर आभार प्रदर्शन अपर्णा भंडारे यांनी केले. यावेळी भिलदरी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्षा रेवतीताई मांटे, संस्थेचे सचिव डॉ. सुखदेव मांटे, प्राचार्या लतिका मनोज, उपप्राचार्य एलीया गायकवाड, वरूण अंबेकर, सोनाली खंदारे, रविंद्र गिरे, वर्षा जयरंगे, महेंद्रसिंग परदेशी, मोहिनी श्रीवास्तव, गिरीराज कुलकर्णी, अयोध्या पितळे, रेणुका पळसकर, अलकनंदा घुले, वसंत चित्राल, रेखा शेळके, शामली वानखेडे, लक्ष्मी ठोकरे, शोभा जगधने, नारायण मोरे, राजू काकड आदी उपस्थित होते.

श्री विठ्ठल प्राथमिक शाळा
जालना । स्वराज्य ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित हेल्पलाइन बद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापिका शुभांगी येमुल या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून मंगल उगले उपस्थित होत्या. यावेळी उपस्थितकार्यक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिका एन. एस. वाघ, एन. के. फराटे जी.पी.शंकर, पी. पी. कुलथे, आर. जी. मुंढे, एस. पी. काळे, ए. एम. ढाकणे, एस. ए. घारे, व्ही. के. फराटे, के. एस. बोद्दुल, एस. बी. साळुंखे, ए. एच. श्रीरामे, पी. एल. पारे, एन. जी. जाधव, बी. एल. सुपेकर, एस. एस. स्वामी, आर. बी. येमुल, सी. ए. सामल ए. एम. सुर्यवंशी तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिजाऊ इंटरनॅशनल स्कूल
जाफराबाद । जिजाऊ इंटरनॅशनल इंग्लिश मिडियम स्कूल जाफराबाद येथे सर्वप्रथम बाळ गंगाधर टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व दीपप्रज्वलन करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक संजय फलटणकर उपस्थित होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून पालक प्रतिनिधी चेतन बायस, विनोद भारद्वाज, भगवान उगले इर्शाद खान, यांची उपस्थिती होती विद्यार्थ्यांनी अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या जीवन चरित्र विषयी मनोगत व्यक्त केले. श्रेया राऊत, संस्कृती भारद्वाज, पृथ्वीराज सत्वन, पुष्कर लोखंडे, जय पहारे,अमन शेख. या विद्यार्थ्यांनी भाषणे केली. रवींद्र धारकर ,नावेद खान, रईस खान, गौतम गायकवाड, परसराम शिरसाट, अंकुश पंडित, सुनिता मोरे, गीता पठाडे, वंदना दुनगहू, मनीषा मस्के, मंजुषा बोराडे, मोहन सोळंकी, विशाल तांगडे, अमोल राऊत, शिंदे सुनील, प्रविण जगताब, दिनेश काकडे देविदास लहाने, रेखा गाडे, ज्योती खंबाट, सरला राऊत, आदींनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहकार्य केले.

ज्ञानज्योत विद्यालय
जालना । ज्ञानज्योत विद्यालय जालना येथे अध्यक्ष सरकटे प्रमुख पाहुणे मालुसरे, उगले यांची उपस्थिती होती. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय यादवराव सरकटे यांनी अण्णाभाऊ साठे तसेच लोकमान्य़ टिळक यांच्या विचारांची प्रेरणा विद्यार्थ्यांनी घ्यावी असे सांगुन विद्यार्थ्यांनी समाजविषयी कर्तव्यपार पाडावे असे सांगीतले. तर खरात सरांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.

माउली वरिष्ठ विद्यालय
जालना । माऊली प्रशासकीय सेवा वरिष्ठ महाविद्यालय, रोहनवाडी, जालना येथे आज लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना प्रा. निवृत्ती घडलींग यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी प्रा. बी. एम. नागरगोजे यांनी या महापुरुषांचा जीवनपट सर्व विद्यार्थ्यांसमोर उलगडून सांगितला, यावेळी गटलेवार, गायकवाड, सुमित आढावे, अमोल ढाकणे, प्रदीप मुंडे, चैतन्य घनवट तसेच सर्व विद्यार्थी व पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभुदास सुतार यांनी तर आभार प्रदर्शन अजय कीर यांनी केले.

जि.प. शाळा जवखेडा ठो.
भोकरदन । जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जवखेडा ठोंबरे मुख्याद्यापक विठ्ठल घायाळ हे अध्यक्ष म्हणुन उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून दयानंद घोरपडे, संजय शिंगणे, प्रताप ठोंबरे, मिलींद वाघ, काळे आदी उपस्थित होते, नियोजित वक्तृत्व स्पर्धेत १७ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन ए. बी. काशिद तर आभार प्रदर्शन पांडुरंग विठ्ठल मिसाळ यानी मानले. संध्या वाघ, गायत्री ठोंबरे, पायल वाघ, निकिता ठोंबरे आदी उपस्थित होते.

जि.प.प्रा.शा. वडाळा
धावडा । भोकरदन तालुक्यातील धावडा येथून जवळच अडीच किमी अंतरावर डोंगराच्या कुशीत वसलेल्या वडाळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमीत्त अभिवादन करण्यात आले. यावेळी आर. एच. गव्हाणे, जी. आर. पानपाते, मुख्याध्यापक जी. एस. झीने यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी साहेबराव गवळी, साहेबराव दांडगे, कल्पना संजीव जाधव, अशोक जाधव, व्ही. एस. तायडे,साहेबराव पवार आदींची उपस्थिती होती.

रामकृष्ण पाटील विद्यालय
जालना । केळीगव्हाण ता. बदनापुर येथील रामकृष्ण पाटील विद्यालयात लोकमान्य टिळक आणि अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन चरित्रावर आधारित निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. निबंध लेखन स्पर्धेत वर्ग पाचवी ते दहावी या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक रविंद्र भडांगे, सहशिक्षक उद्धव गिते, सुरेश सुरासे, प्रल्हाद नेमाने, सहशिक्षीका सुवर्णा मगर, काजल मोरे, वैशाली इंगळे, सुनिता व्यवहारे, पुजा वाघमारे, आश्विनी कवचट तसेच शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

तीर्थपुरी मत्स्योदरी महाविद्यालय
तीर्थपुरी । तीर्थपुरी येथील मत्स्योदरी कला महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी निमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील खांडेभराड, डॉ.भगवानसिंग बैनाडे, रासेयोचे कार्यक्रमधिकारी डॉ. जायदा शेख, डॉ. अंकुश चव्हाण, डॉ. प्रबोधन कळंब, डॉ. रामलीला पवार, डॉ. प्रदिप लगड, डॉ. प्रदिप जाधव, डॉ. कल्पना विटोरे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जीवनराव पारे विद्यालय
जालना । जीवनराव पारे विद्यालयात प्रमुख पाहुणे निर्मलाताई ठक्कर, मोहिनी चौधरी, आरती वडगावकर, मनोज वडगावकर हे उपस्थित होते. अण्णा भाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार पाहुण्याच्या हस्ते अर्पण करण्यात आले. वर्ग नववी ब मधील विद्यार्थ्यांनी श्रध्दा चव्हाण, प्रतिक्षा वाघमारे, गीता इंगळे, अनुराधा आढाव, शिवानी पाठक, पल्लवी आदमाने यांनी तयार केलेले भित्ति पत्रक “साहित्य सम्राट’ याचे अनावरण पाहूण्याच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष पारे व आभार ओमप्रकाश एखंडे यांनी केले.

प्रबोधनकर ठाकरे विद्यालय
शहागड । येथील प्रबोधनकार ठाकरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापक महेश गोडबोले, शिक्षक जालिंदर धनवडे यांनी लोकमान्य टिळक आणि भारतीय स्वातंत्र्य व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे आणि समाजप्रबोधन याविषयी माहिती दिली. सूत्रसंचालन जायभाये दादासाहेब यांनी केले तर आभार ताहेर तांबोळी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...