आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामपंचायत निसटली:परतूर तालुक्यातील 26 ग्रामपंचायतींवर भाजपचा दावा; आष्टी काँग्रेसकडून निसटली

परतूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया सुरू असून उमेदवारी अर्ज परत घेण्याच्या शेवटच्या दिवशी ४१ पैकी ३ ग्रामपंचयतींच्या सरपंचांची निवड बिनविरोध झाल्याने एकूण ३८ ग्रामपंचायतीसाठी १८ डिसेंबर रोजी मतदान पार पडले होते. मंगळवारी मतदानाचे निकाल घोषित झाले. ३८ पैकी सर्वाधिक २६ ग्रामपंचायतीवर भाजपाने दावा केला आहे. वरफळ, उस्मानपुर, देवला, दैठणा खुर्द, येनोरा, पिंपरुळा, खडकी/ कंडारी, वाढोणा, पाडळी, बामणी आणि शेवगा या ११ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीने दावा केला आहे. कॉँग्रेसने देखील ५ ग्रामपंचयतीवर दावा केला आहे तर बाबूलतारा आणि आनंदवादी ग्रामपंचायतीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने दावा केला आहे. तर शिंदे गटाला एकही जागा मिळाली नाही.

तालूक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या आष्टीत भाजपाचा सरपंच पदाचा उमेदवार विजयी झाला होता. गेली पांच वर्ष आष्टीत कॉँग्रेसची सत्ता होती. संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या लोणी खुर्द मध्ये भाजपा आणि राष्ट्रवादी मध्ये दुरंगी लढत झाली. माजी मंत्री तथा भाजपचे परतूरचे आमदार बबनराव लोणीकर तसेच भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांच्या लोणी खुर्द गावात सरपंचपदी लोणीकरांचे पुतणे गजानन सूनीलराव यादव लोणीकर निवडून आले आहेत. त्यांनी राष्ट्रवादीचे उमदेवार संग्राम मनोहर यादव यांचा १०४ मतांच्या फरकाने पराभव करत विजय मिळवला आहे.

थेट सरपंच पदाच्या निवडणुकीत भाजपचे गजानन लोणीकर आणि राष्ट्रवादीचे संग्राम यादव यांच्यात थेट दुरंगी लढत होती. अत्यंत अटीतटीच्या या लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. गजानन लोणीकर यांना ८१९ तर संग्राम यादव यांना ७१५ मते मिळाली. १०४ मतांच्या फरकाने गजानन लोणीकर विजयी झाले आहेत. एकूण सदस्य संख्या असलेल्या या ग्रामपंचायतीत सदस्यांमध्ये देखील भाजपने बहुमत मिळविले आहे. नऊ पैकी ५ जागांवर भाजपा पॅनलचे तर ४ जागांवर राष्ट्रवादीच्या पॅनलचे उमेदवार निवडून आले आहेत.

लोणीकरांचे पुतणे विजयी
माजी मंत्री तथा भाजपचे परतूरचे आमदार बबनराव लोणीकर तसेच भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांच्या लोणी खुर्द गावात सरपंचपदी लोणीकरांचे पुतणे गजानन सूनीलराव यादव लोणीकर निवडून आले आहेत. त्यांनी राष्ट्रवादीचे उमदेवार संग्राम मनोहर यादव यांचा १०४ मतांच्या फरकाने पराभव करत विजय मिळवला आहे. या अगोदर देखील लोणी खु. ग्रापं भाजपकडेच होती

बातम्या आणखी आहेत...