आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
हाथरस येथील बलात्कार आणि हत्येच्या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. पीडितेचा मृत्यू आणि नंतर यूपी पोलिसांनी रात्री घाईघाईत कुटुंबीयांविनाच तिच्यावर केलेल्या अंत्यसंस्कारामुळे उत्तर प्रदेश सरकारवर टीकेची झोड उठवलेली पाहायला मिळतेय. दरम्यान महाराष्ट्रातील नेत्यांकडूनही या प्रकरणाचा निषेध केला जातोय. यावरुन आजा महाराष्ट्रात उत्तर प्रदेशातील घटनेवरुन राजकारण केले जात असल्याचा आरोप विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीन दरेकरांनी केला आहे. यासोबतच सामनामधून केलेल्या टीकेला उत्तर त्यांनी दिले आहे.
याविषयावर बोलताना प्रविण दरेकर म्हणाले की, 'भाजपकडून उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या दुर्दैवी घटनेच्या चौकशीची मागणी करण्यात आलेली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील कठोरपणे कारवाई करण्याचीही मागणी केली आहे. तरीही महाराष्ट्रात उत्तर प्रदेशातील घटनेवरून राजकारण केले जातेय.' असे प्रविण दरेकर म्हणाले. जालना जिल्ह्यात बदनापूर येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
दरम्यान आज शिवसेना मुखपत्र सामनामधून योगी सरकारवर टीकास्त्र साधण्यात आले आहे. यावरही प्रविण दरेकरांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले की, 'योगी सरकार उत्तर प्रदेशातील परिस्थिती हातळण्यात अजिबात अपयशी ठरलेले नाही. भाजपचे सरकार असले तरी आम्ही आमची भूमिका स्पष्ट केलेली आहे. तसेच या घटनेवर पंतप्रधान काहीच बोलत नाही असे संजय राऊतांनी म्हटले आहे. यावरुन दरेकरांनी उत्तर दिले आहे.
सामनामधील टीकेवरुन म्हणाले...
दरेकर म्हणाले की, राऊतांना माझा सवाल आहे की, रोह्याला भयंकर घटना घडली 14 वर्षांच्या तरुणीला सामूहिक बलात्कार करून दरीत टाकण्यात आले, पुण्याला घटना झाली त्या तरुणीला डोंगरावर नेऊन ठेचून मारण्यात आले. त्या वेळी काय झोपला होता काय? क्वारंटाइन सेंटरमध्ये बलात्कार होत आहेत त्याच्यावर चकार शब्द काढायचा नाही आणि उत्तरप्रदेशात जे होतय त्याच राजकारण हे करत आहेत. राजकीय लोकांची करणी आणि कथनी वेगळी आहे असे म्हणत त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.