आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप आमदार बबनराव लोणीकर यांचा विरोधकांवर आरोप:गलोबल टेंडरच्या नावाखाली राजेश टोपेंमुळे तीन लाख लोकांचा मृत्यू

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना तत्कालीन आरोग्यमंत्री राजेश टोपेंमुळे महाराष्ट्रात तीन लाख लोकांचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी केला. परतूर येथे आयोजित “धन्यवाद मोदी’जी अभियानाची माहिती देण्यासाठी एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते त्या वेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना आमदार लोणीकर बोलत होते.

कोरोनाकाळात आघाडी सरकारने ग्लोबल टेंडर नावाचा इंग्रजी शब्द आणला. त्या वेळी सहा हजार कोटींची लस विकत घ्यायची, असे तत्कालीन आरोग्यमंत्री राजेश टोपे टीव्हीवर सांगायचे. परंतु, हा प्रकार नुसता ‘बोलाचाच भात अन् बोलाचीच कढी’ असा होता. त्यामुळे महाराष्ट्रात तीन लाख लोकांचा मृत्यू झाला. ग्लोबल टेंडरच्या नावाखाली आघाडी सरकारने जनतेची फसवणूक केली. एकही लस विकत घेतली नाही, असा आरोप आमदार लोणीकर यांनी केला.

..तर अर्धा महाराष्ट्र रिकामा झाला असता पंतप्रधान मोदी महाराष्ट्रासाठी लस देत नाहीत, असा आरोप टोपे, अजित पवार करायचे. हे लोक एकीकडे लसीसाठी ग्लोबल टेंडर काढण्याची भाषा करायचे आणि दुसरीकडे मोदी लस देत नाहीत म्हणून अपप्रचार करायचे. परंतु, मोदींनी लस दिली नसती तर १२ कोटी महाराष्ट्राच्या लोकसंख्येपैकी अर्धा महाराष्ट्र रिकामा झाला असता, असे वक्तव्य आमदार लोणीकर यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...