आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकीय:पिंपळगाव रेणुकाई सोसायटीत भाजप गटाचा एकतर्फी विजय; राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनलचा उडवला धुव्वा

पिंपळगाव रेणुकाई11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या निवडणूकीत भाजपच्या गटाने राष्ट्रवादीचा गटाचा धुव्वा उडवत सर्वच्या सर्व १३ जागेवर दणदणीत विजय मिळवला. गेल्या वीस वर्षांपासून भाजपची सत्ता असलेल्या ग्रामपंचायतवर राष्ट्रवादीच्या गटाने मागील दीड वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत भाजपच्या गटाचा पराभव करत १३ पैकी १२ जागा मिळवल्या होत्या,त्याची सल भाजपा तालुकाध्यक्ष राजेद्र देशमुख यांच्या मनात कायम होती त्यामुळे आता झालेली ही सोसायटीची निवडणूक दोन्ही पक्षासाठी प्रतिष्ठेची झाली होती. यात भाजपने सर्व जागांवर विजय मिळवत आपले वर्चस्व निर्माण केले.

विजयी उमेदवारांची गावातून जेसीबीने गुलालाची उधळण करीत मिरवणूक काढण्यात आली. विजयी उमेदवारांत तारांचद आहेर, भगवा गावंडे, कडुबा दळवी, अशोक देशमुख, कैलास देशमुख, विष्णू तायडे, गुंफाबाई पंडीत, बाबु बेराड, राजू धायडे, शालुबाई आहेर, शकुंतलाबाई बोर्डै, रतन नरवाडे, नसीरखॉपठाण यांचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...