आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकीय होळी:पवारांची अवस्था 'मजबुरी का नाम महात्मा गांधी', राज्यातील राजकीय वाटचाल आवडत नसली तरी त्यांना काही करता येत नाही! -दानवे

जालना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कट कारस्थान रचून कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याची बदनामी केली जात असेल तर ते योग्य नाही. महाराष्ट्राची चाललेली राजकीय वाटचाल शरद पवार यांनाही मान्य नाही. पण मजबुरी का नाम महात्मा गांधी अशी त्यांची अवस्था झाली आहे अशी खोचक टीका केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली.

रावसाहेब दानवे म्हणाले, पुढील २५ वर्षे भाजपचे सरकार टिकणार आहे. प्रथमदर्शनी आमच्या राज्यातील नेत्याविरुद्ध चाललेला प्रकार हा कट कारस्थानाचा आहे असे दिसते. पेनड्राईव्ह प्रकरणाची चौकशी निष्पक्षपणे व्हायला हवी. दोषींना शिक्षा व्हायलाच हवी.

काँग्रेसच्या स्थितीबद्दल ते म्हणाले, काँग्रेसवाले बदलू शकत नाही. सोनिया गांधी, राहुल, प्रियंका गांधींकडे पक्षाचे नैतृत्व दिले, पण उपयोग झाला नाही. काँग्रेसकडे उत्तर प्रदेशातील ४०३ जागांपैकी ३०० च्यावर जागा होत्या आता मात्र त्यांच्या वाट्याला जागा मिळणे म्हणजे काँग्रेसची अवस्था प्रादेशिक पक्ष म्हणुनही राहिला नाही याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

भाजपचा रंग हा ओरिजनल आहे. कुणाचा रंग कोणता आहे हे निवडणूक असली कि समजते. तर शिवसेनेचा रंग दाऊदच्या माणसाला साथ दिल्याने फिका पडला आहे. अशी टीका केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपच्या रंगात भेसळ आहे असे वक्तव्य आज सकाळीच केले होते. आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

मी कधीच वाढदिवस साजरा करत नाही - रावसाहेब दानवे

आज धुळवड आणि रावसाहेब दानवे यांचा वाढदिवस दोन्ही एकाच दिवशी आले आहेत. रावसाहेब दानवेंनी मी कधी वाढदिवस साजरा करत नाही असे सांगताना आज लोक होळीच्या शुभेच्छा देण्यासाठी आल्याने मला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहे असे सांगितले. या वेळी बोलताना त्यांनी लहान पनीचा एक किस्सा सांगितला. लहानपणी आम्ही खूप होळी साजरी करायचो, गोवऱ्या गोळा करायचो बोंब ठोकायचो ज्याच्याशी भांडण आहे, त्याच्या नावाने नावाने बोंब ठोकायचो, अशी आठवणींना दानवे यांनी उजाळा दिला आहे.

आमचा रंग खरा, दानवेंचे राऊतांना प्रत्युत्तर

कुणाचा रंग कोणता आहे हे निवडणूक असली कि समजते. शिवसेनेचा रंग दाऊदच्या माणसाला साथ दिल्याने फिका पडला आहे. आमचा रंग ओरिजनल असल्याचे त्यांनी सांगितलं आहे.

बातम्या आणखी आहेत...