आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुजंग विजयी:राजूर ग्रामपंचायतीत भाजपच्या प्रतिभा भुजंग विजयी

श्रीक्षेत्र राजूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील ग्रामपंचायत निवडणूकीत भाजपाचे दोन गट आमने-सामने होते. विद्यमान सरपंच भाऊसाहेब भुजंग यांचे श्री राजुरेश्वर ग्राम विकास पॅनल तर माजी सरपंच शिवाजी पुंगळे यांचे श्री महागणपती ग्राम परिवर्तन पॅनल उभे होते. दोन्ही गटात चुरशीची लढत पहावयास मिळाली. मतदारांनी विद्यमान सरपंच भाऊसाहेब भुजंग यांच्या पॅनलला कौल दिला. सरपंचपदी प्रतिभा भुंजग विजयी झाल्या असून ११ सदस्य निवडून आले.

विद्यमान सरपंच भाऊसाहेब भुजंग यांनी विविध विकास कामे हाती घेऊन पूर्णत्वाकडे नेली आहेत. ग्रामस्थांची पाणीटंचाई कायमस्वरूपी दूर केलेली आहे. भाजपमध्येच दोन गट तयार झाले होते. या दोन्ही पॅनलमध्ये चुरशीची लढत पहावयास मिळाली. प्रतिभा भुजंग यांना २ हजार ५४ मते पडली. ३०० मतांची आघाडी घेऊन त्या विजयी झाल्या. तर भुजंग यांच्या पॅनलचे राहूल दरख, रामेश्वर सोनवणे, जिजाबार्इ करपे, तुळसाबार्इ मोरे, सुनंदा पवार, मुसासेठ सौदागर, सुशीलाबाई भुजंग, गिता पुंगळे, रेखा डवले, जिजाबार्इ मगरे, गुलाबराव मगरे तर पुंगळे यांच्या पॅनलचे निवृत्ती पुंगळे, सरला पुंगळे हे दोन सदस्य निवडून आले. विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...