आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढूनही शहरातील जड वाहनांची वाहतूक बंद होत नाही म्हणून जालना शहरातील भाग्यनगर - संजोगनगरवासियांनी दोन तास ‘रास्ता रोको’ आंदोलन केले.जुना जालना भागातील मुक्तेश्वर द्वार-वेस पाठक मंगल कार्यालय समोरून मुक्तेश्वर तलावा शेजारील रस्त्याने अंबड नाका रेल्वे गेट, अण्णाभाऊ साठे पुतळा या रस्त्याने दिवस-रात्र अनेक महिन्यांपासून जड वाहनांची सर्रास वाहतूक सुरू आहे. वास्तविक या रस्त्याजवळ शाळा- महाविद्यालय, क्लासेस- मंदीरे असल्याने लहान बालकांपासून ते ज्येष्ठ नागरिकांची पायी ये-जा चालू असते.
भरधाव जा ये करणाऱ्या जड वाहनांमुळे अनेकदा अपघाताच्या घटना घडलेल्या असून या रस्त्यावर मोठे- मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. या निषेधार्थ रास्ता रोको करून जड वाहनांची वाहतूक रोखली.
यावेळी संदीप देशपांडे, प्रा. डॉ. रावसाहेब ढवळे, अरुण पाटील, डॉ. संजय रुईखेडकर, बाळकृष्ण शहापूरकर, राजेंद्र देशपांडे, अनिल वांगे, अर्चना भवने, प्रदीप कुलकर्णी, एस.डी. शेळके, शाम धनेश, के.एस. लांडगे, वसंत देशमुख, मनोहर पाटील, शेषराव खडके, अनिकेत वैध, ईश्वर बारवकर, प्रथमेश दंडके, चिन्मय जोशी, उत्तमराव केदारे, गणेश भवने, महेश संगई, खंडेराव व्यापारी, योगेश जामखेडकर, ए.डी. पवार, श्रीकांत बडे, शरदचंद्र गायकवाड, चेतन निरखी आदींनी सहभाग घेतला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.